शिला" शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे.
शिला" शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे.

महामानवास अभिवादन……   शिला” शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे.

शिला" शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे.
शिला” शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे.

लेखीका: सुप्रिया ढोके
राह. नागपुर जिल्हा नागपुर
एखाद्या व्यक्तीच्या केलेल्या कार्याची नकल करने फार सोपे असते, मात्र त्या व्यक्तिच्या चारित्र्याची नकल करायची लायकी फक्त खऱ्या शीलवान व्यक्तीतच असते म्हणून आचरण शून्य आणि दिखावा जास्त करणारेच समाजात मोठ्या प्रमाणात बघायला मिळत असतात.

तुम्ही किती पुस्तक वाचले आणि तुम्ही किती मोठ्या पदावर कार्यारत आहत याने फरक पडत नाही जर तुमचे चारित्र्य आणि तुमचं कृत्य चांगले नाही तर तुम्ही कधीच सच्चे आंबेडकर अनुयायी ठरुच शेकत नाही. हे तुम्हचे तुम्हालाच माहित??

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो ला फुलमाला वाहिली किव्हा काही पुस्तक आणि वह्या वाटल्या असेल किव्हा भारतीय संविधान किवा बाबासाहेबचे फोटो लोकांना वाटले पण आचरण शून्य असेल तर तो एक खरा आदर्श आंबेडकरी अनुयायी असु शकतो काय? तो कदापी असू शेकत नाही. असा आदर्श मला माझा समोरच्या पिढीला नाही द्यायचा म्हणून मी हे दिखावे करत नाही आणि कधी करणार पण नाही उगाच “मणी नाही भाव पण देवा मले पाव” करण्यात अर्थ नसतो तर जे खऱ्या मनाने आणि आचरणात घेऊन केलेले सुकृत्य मनाला समाधान आणि शांति देते उगाच देखावा म्हणून केलेले कार्य कधीच मनाला शांति आणि समाधान देत नसते.

जसे मनुष्याचे शरीर सुंदर दिसायला हवे असते तसेच व्यक्तिच चरित्र्य ही सुंदर असावे लागते तेव्हाच तुमच्या घेतलेल्या शिक्षणाला अर्थ प्राप्त होतो नाही तर सगळेच ढोंग आणि दिखावा असतो. शिक्षण हे वाघिनीच दूध आहे. पण आज लोक लोकांना फसवण्याचे शिक्षण घेत आहे. मी वाचलेले बाबासाहेब आणि त्यांचे तत्व सतत मला चुकीचा मार्गावर चलायला सावध करते इतकेही कोणाला बाबासाहेब कळले तरी तुम्ही घेतलेले कुठलेहि शिक्षण वाया गेले नाही अस मी समजते.

आज 6 डिसेंबर 2021 क्रांतिसूर्य, शिल्पकार, बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करुन त्यांचे विचार जिवनात संयम प्रकाशीत होण्याचा दिवस.

मी सुप्रिया ढोके कॉस्ट्यूम डिझायनर फिल्म चित्रपटाच्या चंदेरी सृष्टी मध्ये कार्य करत आहे. पण आज प्रत्येक क्षेत्रात आप मतलबी पणा दिसून येत आहे. मुद्दाम फिल्म सृष्टीचे नाव लिहितेय कारण काही टुकार लोक 4 पुस्तक जास्त वाचून सरकारचा नोकर बनून स्वतःला खुप हुशार समजतात पण मी म्हणते जो व्यक्ति 4 पुस्तक जास्त वाचतो त्यांच चारित्र तर अत्तरा चा गुनवत्तेच असायला हव ना?? कुनाच चारित्र्य हे त्याच्या नोकरी पेशेतुन किवा त्याच्या कपड्यांचा लांबीतुन कधीच मोजायचे नसते तर त्याच्या कृत्याने आचरणाने त्याच चारित्र्य मोजावे लागते. हा गुण मात्र 4 पुस्तक जास्त वाचणाऱ्यांचा अंगात मला आजपर्यंत दिसून आला नाही याच मला खुप दुःख वाटते.

चित्रपटाचा चंदेरी दुनियेतील प्रत्येक मुलगी ही एक सारखी नसते. काही मुली प्रामाणीक पणे आपले कार्य, कलेवर प्रेम, सामाजिक भान, आपले सप्न पुर्ण करण्याचा हठ्ठास मुळे पण चित्रपट दुनियेशी जुडली असते. ज्यांना स्वता:च्या कामावर पुर्ण विश्वास असतो आणि ते प्रामाणीक पणे आपल कार्य निरंतर करत असते. ते जरी सावकास गतीने आपला सफर तय करत असते ते आपल्या मनगटावर आणि स्वता:वर विश्वास ठेऊन 4 पुस्तक जास्त वाचणा-या चरित्रहीन मनुष्य जो चित्रपटाच्या दुनियेतील प्रत्येक महिलेवर बोट उचलुन लावली जीभ टाळ्याला असे वर्तन करुन महिला वर्गावर प्रश्न चिन्ह उभे करत असते. हा कोनता आदर्श आंबेडकरी अनुयायी असु शेकतो? मी हा विचार करत आहे की, जास्त शिक्षण घेऊन मनुष्याची विचार शक्ती घुटण्यामध्ये जात असेल तर मला कमी शिक्षित मनुष्या बरोबर मैत्री करने चांगल असल्याचे दिसून येणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here