रात्रीच्या 2 वाजता पण सर्प मित्राने कॉमन कोब्रा जातीच्या सापाचा जिव वाचून निस्वार्थी भावनेने आपले कर्तेव्य निभावले.
सर्प मित्र प्रशांत नागे यांनी पकडलेला साप
सिद्धार्थ पाटिल प्रतिनिधी
अकोला:- दहिगांव गावंडे येथील प्रभाकर सावळे यांच्या घरा समोरील बाहेर ठेवलेल्या सिलेंडर पाठी मागे साप जाताना तेथील काही मुलींना दिसून आला रात्रीचे 2 वाजले होते त्यांनी त्या घराच्या बाजूच्या लोकांना उठवून सागितले या सिलेंडर माघे खूप म्होठा साप गेला आहे तेथील सचिन भदे यांनी सर्प मित्र प्रशांत नागे यांना कॉल केला व त्यांना रात्री 2 वाजता बोलऊन घेतले वेळेचा विलंब न कर्ता सर्प मित्र सुरज सदांशिव , प्रशांत नागे त्या ठिकाणावर पोहचले व तेथील सिलेंडर मागे तो साप दळून बसला होता त्या सापाची पाहणी केली असता तो कॉमन कोब्रा जातीचा 5 फूट लांब नाग होता तेथील सिलेंडर बाजूला करून त्या सापाला अत्यन्त शिताफीने पकडले व तेथील लोकांना भय मुक्त केले तेथील महिला व नागरकांनी साप पाहण्या साठी खूप गर्दी केली होती साप पकडताना बंटी सावळे,सचिन भदे, सचिन बडोदे, दिलीप नाईक यांनी अथक परिश्रम घेतले सर्प मित्राने त्या सापाला सुखरूप जगलात सोडून दिले.