काटोल: वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्य महामानवाला केले अभिवादन

✒युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲9923296442📲
काटोल:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य वंचित बहुजन आघाडीच्या काटोल येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात अभिवादन सभा घेण्यात आली. यावेळेस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे ज्येष्ठ नेते रामराव पाटील होते तर कार्यक्रमाचे आयोजक वंचित बहुजन आघाडीचे नागपुर जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी सभापती दिगांबर डोंगरे, ज्येष्ठ नेते जानराव गावंडे, मुख्य मार्गदर्शक नागपुर विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य डॉ. कैलाश कडु, प्रा. विरेंद्र इंगळे, प्रा. अशोकराव झाम्बरे, प्रा. प्रभाकर मेश्राम, ज्येष्ठ बोधाचार्य गुलाबराव शेंडे, डॉ. सुधाकर कावळेज़ सुमेध गोन्डाने, महिला आघाडी अध्यक्षा मिना पाटील, प्रसिद्ध लेखिका कवयत्री सरीता रामटेके, डॉ. सुनिल नारनवरे, मनोहर कौरती आदि प्रमुख उपस्थितीत होते. यावेळेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मेणबत्ती प्रज्वलित करून माल्यार्पन करून बुद्ध वंदना घेण्यात आली (डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. एकच साहेब बाबासाहेब. जब तक सुरज चांद रहेंगा बाबा तेरा नाम अमर रहेंगा. असा जय जय घोष करून कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळेस प्रास्ताविक करताना दिगांबर डोंगरे म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मेलेल्या माणसात आपल्या लेखनीतुन जिवंत पणा आणण्याचे काम केले, प्रत्येक घटकाला अधिकार व हक्क संविधानाच्या माध्यमातुन मिळवून देवून सामाजिक समता प्रस्थापित केली. त्यामुळेच आज सर्वजण ताठ मानेने जगत आहे. पण अजुनही बाबासाहेबांचे विचार देशात गतीने समाजमणात रूजताना दिसत नाही. डॉ. बाबासाहेबांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य त्यांना अभिवादन करताना त्यांचे विचार आत्मसात करावे हिच आदरांजली ठरेल असे डोंगरे म्हणाले.
यावेळेस डॉ. कैलाश कडु यांनी डॉ. बाबासाहेबांच्या आर्थिक सामाजिक राजकीय पैलुवर विचार व्यक्त केले प्रा. विरेंद्र इंगळे, जानरावजी गावंडे, सुधाकर कावळे, अशोकराव झाम्बरे यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन युवा कार्यकर्ते श्रीकांत गौरखेडे यांनी केले.
यावेळेस सुरेशराव देशभ्रतार, दिगांबरराव भगत, प्रकाश निस्वादे, बाबाराव तागडे, युवराज तागडे, बाबा तागडे, विनायक ढोणे. जिवन सोनुले, भांजी पाटील, पितांबर गायकवाड, नत्थुजी भाजीखाये, श्रीकृष्ण ढोके, नामदेवराव गजभिये, हंसराज तागडे, दिनेश तायडे, अन्वर शैख, नेतराम सोमकुवर, नीळकंठ गजभीये, मिना पाटील, संध्या पाटील, सुजाता डबरासे, हर्षा नारनवरे, कविता मडके, मनिषा शेंडे, मोना सोमकुवर, विद्या तागडे, वैशाली दलाल यांच्यासह मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व भीमसैनीक उपस्थित होते.