मनोहरभाई पटेल महाविद्यालयात संविधान सप्ताह व महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्र

57

मनोहरभाई पटेल महाविद्यालयात
संविधान सप्ताह व महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्र

मनोहरभाई पटेल महाविद्यालयात संविधान सप्ताह व महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्र
मनोहरभाई पटेल महाविद्यालयात
संविधान सप्ताह व महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्र

देवरी – येथील मनोहरभाई पटेल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संविधान सप्ताह व महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून ‘ भारताच्या विकासात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची संवैधानिक भूमिका’ या विषयावर ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. चंद्रमनी गजभिये व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा.सुनीता रंगारी व सहकार्यक्रम अधिकारी प्रा. आशिष गडवे यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण झिंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून नरेंद्र तिडके महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्रीकांत भोवते उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रचार्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली . आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. झिंगरे यांनी सागरातील पाण्याचा प्रत्येक थेंब म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या ज्ञानाचा एक एक पैलू होय ,असे उद्गार काढले .
डॉ. भोवते यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे देशाचे हित तर साधले गेलेच शिवाय भारतीय संविधानाची छाप जगातील अनेक देशांच्या संविधानावर पडली, इतकेच नव्हे तर जागतिक मानवाधिकार संघटनेच्या जाहीरनाम्यात भारतीय संविधानातील तत्वांचा समावेश करण्यात आल्याचे महत्वपूर्ण विवेचन केले . पुढे बोलताना डॉ. भोवते यांनी भारतीय संविधानाला अपेक्षित सामाजिक लोकशाही अस्तित्वात आल्याशिवाय राजकीय व आर्थिक लोकशाही देशात तग धरू शकणार नाही ,आणि त्यासाठी देशातील नागरिकांनी जात,धर्म,पंथ यांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रवादाची भावना जोपासली पाहिजे असे मत व्यक्त केले . सत्ताधाऱ्यांनी प्रामाणिकपणे संविधान लागू केले तर देश प्रगतीच्या शिखरावर पोचू शकतो, पण दुर्दैवाने असे होताना दिसत नाही, याची खंतही त्यांनी व्यक्त केली .’
या राष्ट्रीय वेबिनारचे प्रास्ताविक भाषण करताना प्रा. सुनीता रंगारी यांनी संविधान जाळण्यापर्यंत मजल गेलेला आपला देश एका नव्या पारतंत्र्याकडे वाटचाल करू लागला आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला . डॉ. चंद्रमनी गजभिये यांनी डॉ. श्रीकांत भोवते यांचा परिचय करून देताना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेतला.
या राष्ट्रीय वेबिनारला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. विविध महाविद्यालयातील प्राध्यापक,व विद्यार्थी मोठ्या संख्येने वेबिनारला उपस्थित होते.प्रा. आशिष गडवे यांनी सर्व वक्त्यांच्या भाषणांचा आढावा घेत उपस्थितांचे आभार मानले.
वेबिनारच्या आयोजनात तांत्रिक बाजू प्रा. जयंत राणे, प्रा. हुमेश भोयर यांनी सांभाळली .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ . देवेंद्र बिसेन,डॉ.अभिनंदन पाखमोडे, प्रा. शुभांगी मुनघाटे यांनी प्रयत्न केले.