काटोल येथे मेणबत्ती शांती मार्च काढुन केले महामानवाला अभिवादन.

✒युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲 9923296442 📲
काटोल:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य काटोल येथे आंबेडकरी अनुयायांनी मेणबत्ती शांती मार्च काटोल येथे काढला. हा शांती मार्च हत्तीखाना भीमनगर काटोल येथून सुरवात झाली त्यात मोठ्या प्रमाणात भीमसैनीक, महिला पुरुष व युवक पांढरे शुभ्र कपडे परिधान करून हातात मेणबत्ती घेवुन पेठबुधवार, आयुडिपि रेल्वे स्टेशन, मुख्य बाजारपेठ ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ आंबेडकर यांचा पुतळ्याजवळ यचा समारोप करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मेणबत्त्या लावून बुद्ध वंदना घेवुन. (डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय. असो जब तक सुरज चांद रहेगा तब तब बाबा तेरा नाम अमर रहेंगा.) अशा घोषणा देत भीमसैनीकांनी परिसर दणाणून सोडला व सर्वानी मौन धारण करून आदरांजली वाहून शांती मार्चचा समारोप करण्यात आला.
या मार्चचे आयोजक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी सभापती नगर पालिका काटोलचे दिगांबर डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते हर्षद बनसोड यांच्यासह दिगांबरराव भगत, भिमराव खोब्रागडे, आकाश मेश्राम, कृष्णाजी गवईकर, भीमरावजी बनसोड, सुरेश देशभ्रतार, प्रा. विरेंद्र इंगळे, प्रकाश देशभ्रतार, श्रीकांत गौरखेडे, प्रा. प्रभाकर मेश्राम, प्रा. अशोकराव झामरे, नत्थुजी भाजीखाये, जानरावजी गावंडे, विजय गायकवाड, प्रभाकर खोब्रागडे, श्रीकृष्ण ढोके, माजी नगराध्यक्षा पद्मा गायकवाड, मिना पाटील, सरीता रामटेके, ललिता दुपारे, अर्चना झिल्पे, संध्या पाटील, कविता मडके, हर्षा नारनवरे, मोना सोमकूवर, ममता बनसोड, रीना बनसोड, सुशीला पंचभाई, प्रज्ञा डोंगरे, विनायक ढोणे, नामदेव धवराल, बाबाराव गोंडाने, नीळकंठ गजभिये, लहानू गायकवाड यांच्यासह शेकडो भीमसैनीक उपासक उपासकी व तरूण युवक शांती मार्च मध्ये सहभागी झाले होते.