धडक सिंचन विहिरीचे देयके द्या:अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या.

✒क्रिष्णा वैद्य✒
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500
ब्रह्मपुरी : -गेल्या एक-दोन वर्षापासून संबंधित कार्यालयामध्ये सततची पायपीट करून सुद्धा धडक सिंचन विहिरीचे उर्वरित देयके मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी चक्क ! शासन व प्रशासनाच्या निष्काळजीपणा दाखविला असुन बांधण्यात आलेल्या धडक सिंचन विहिरीचे उर्वरित देयके शक्य तितक्या लवकर मिळवून द्यावे अन्यथा आत्महत्येची परवानगी द्यावी अशी मागणी ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांना निवेदनातून केली आहे.
शासनाचा सिंचन विहिरीचा धडक मोहीम कार्यक्रम सन २०१९-२० (अंदाजपत्रकीय किंमत रुपये २,५०,००० हजार)अंतर्गत शेत विहिरीचे बांधकाम पूर्ण केलेले आहे त्यासाठी घरातील असलेली जमापुंजी पूर्णता संपलेली असून धडक सिंचन विहिरीच्या बांधकामासाठी लागणारी मजुरी व लागणारे इतर साहित्य उसनवार पैशे घेऊन केलेले आहे मात्र आजतागायत आम्हाला फक्त 80 हजार रुपये देयके प्राप्त झालेले आहेत मात्र उर्वरित रक्कम अजून पर्यंत मिळाली नाही. आम्ही अल्पभूधारक शेतकरी असून बराच कालावधी लोटून सुद्धा घेतलेली उसनवार रक्कम नेमकी परत करायची कुठून असा प्रश्न सारखा भेडसावत असून आमची हालाखीची परिस्थिती लक्षात घेता सदर रक्कम शक्य तितक्या लवकर मिळवून द्यावी अन्यथा आम्हाला आत्महत्या करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी ब्रह्मपुरी तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांना निवेदनातून केली आहे . यावेळी निवेदन देतांना त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांमध्ये हिरामण मोहुर्ले राजीराम दिवटे एकनाथ दिवटे रा , बल्लारपूर,राजकुमार ठाकरे रा खरकाळा,गजान धोंगडे रा मुडझा,नीलकंठ मानापुरे , लक्ष्मण नवघडे , शालिक बोबटे विलास राऊत बबन राऊत व अन्य शेतकरी उपस्थित होते