बीड: देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणी एस आय टी गठीत, पंकज कुमावत करणार तपास

70

बीड: देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणी एस आय टी गठीत, पंकज कुमावत करणार तपास

बीड: देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणी एस आय टी गठीत, पंकज कुमावत करणार तपास
 देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणी एस आय टी गठीत, पंकज कुमावत करणार तपास

✒️श्याम भुतडा✒️
बीड जिल्हा प्रतिनिधी
9404118005
बीड — जिल्ह्यात चर्चेत असलेल्या देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात आष्टी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या दोन गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी अखेर विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. बीडचे अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनात पंकज कुमावत हे तपास अधिकारी म्हणून काम करणार आहेत.

बीड जिल्ह्यात देवस्थान जमिनीचे घोटाळे मोठ्य प्रमाणावर चर्चेत आहे. या पार्श्‍वभूमीवर आष्टी पोलीस ठाण्यात देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या प्रकरणात महसुलच्या काही अधिकार्‍यांनाही अटक झाली होती. तर काही राजकीय व्यक्तींचा या गुन्ह्याशी संबंध असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी औरंगाबाद विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी अखेर एसआयटी गठित केली आहे.

अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर आणि आष्टीचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस व पोलीस उपनिरीक्षक आर.ए.शेख हे या समितीत असणार आहेत. देवस्थान जमिन घोटाळा प्रकरणात एसआयटीची स्थापना होणे हा या प्रकरणातील महत्वाचा टप्पा मानला जात आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी आतापर्यंत जिल्ह्यात केलेल्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर नक्कीच देवस्थान जमीन घोटाळ्याचे पाळंमुळं खणून काढली जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे