राजुरा येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती सोहळा संपन्न. – श्री गुरुदेव सेवा महिला मंडळ रामपूर यांनी सादर केले भजन.

55

राजुरा येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती सोहळा संपन्न.
– श्री गुरुदेव सेवा महिला मंडळ रामपूर यांनी सादर केले भजन.

राजुरा येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती सोहळा संपन्न. - श्री गुरुदेव सेवा महिला मंडळ रामपूर यांनी सादर केले भजन.
राजुरा येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती सोहळा संपन्न.
– श्री गुरुदेव सेवा महिला मंडळ रामपूर यांनी सादर केले भजन.

संतोष मेश्राम
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो 9923497800

संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त संताजी सभागृह राजुरा गडचांदूर रोड सास्ती टी पॉईंट येथे संत संताजी यांच्या जयंती व भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी श्री गुरुदेव महिला भजन मंडळ रामपूर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते श्री संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी संताजी च्या प्रतिमेचे पूजन करून आरती केली.यावेळी शंकरराव बानकर , आनंदराव बेले, पंढरीनाथ चन्ने, पुरुषोत्तम गंधारे, चंद्रप्रकाश बुटले, बादल बेले, देविदास टिपले, अनिल खनके, मनीष मंगरूळकर, देवेंद्र घटे, सतीश बानकर, विक्रम साठवणे, आनंदराव हिवरे, कपिल ईटणकर, प्रशांत रागीट, पुरुषोत्तम चापले, विलास मेंगरे, अर्चना अशोक मंगरूळकर, आशा दिलीप ईटणकर, जयश्री मनीष मंगरूळकर, मंदा शंकरराव मोगरे, एड. निनाद येरणे, जगदीश बुटले, मधुकर रागीट, किशोर बानकर, कोंडू नरड, वैभव हरणे, महेश रघाताटे , वृषाली देवेंद्र घटे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्री संत संताजी जगनाडे महाराज शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा, विदर्भ तेली समाज संघटना तालुका राजुरा, तेली समाज कल्याण मंडळ वेकोलि, तेली समाज युवक मंडळ राजुरा यांनी अथक परिश्रम घेतले.