शेतक-यांने उभ्या शेतातील सोयाबीनचे पीक जाळले.

58

शेतक-यांने उभ्या शेतातील सोयाबीनचे पीक जाळले.

शेतकरी संकटात असताना शासनाने कुठलीही मदत जाहीर केली नाही. त्यामुळे शेतक-यांने उचलले टोकाचे पाऊल.

प्रतिनिधी
यवतमाळ:- या वर्षी संपूर्ण राज्यातील शेतक-यांचे पावसानं मोठ्या प्रमाणात नुसकान झाल
पावसानं अक्षरशः थैमान घातलं. अतिवृष्टी, घाम गाळून, कष्ट करून वाढवलेल्या सोयाबीनच्या पीकाचं एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. अपेक्षा होती ती फक्त सरकारच्या मदतीची. मात्र तालुका सरकारी निकषात बसत नाही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं . मग त्या संतापलेल्या बळीराजानं टोकाचं पाऊल उचललं.
यावर्षी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी असमानी आणि सुलतानी संकटांनी ग्रस्त आहे . सुरवातीला शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले . कशीबशी पैश्याची तयारी करून शेतकऱ्यांनी दुबार पेरणीही केली . जिल्ह्यात दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतात पिके दिमाखात उभी होती .शेतकऱ्यांच्या पदरी दोन पैसे पडतील अशी आशाही निर्माण झाले होती . पण परतीच्या पावसाने पिकांचे मातेरे केले .
शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या आशाही नष्ट झाल्यात. अश्याच शेतकऱ्यांपैकी एक आहेत महागावचे मनीष जाधव. पावसाने उसंत घेतल्याने सोयाबीन सोंगणीस सुरवात केली .सोयाबीनच्या झालेल्या नुकसानीची कल्पना अधिकाऱ्यांना दिली असता सरकारी निकषात आपला तालुका बसत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले .
संतप्त झालेल्या मनीष यांनी सरकारचा निषेध व्यक्त करीत आपल्या शेतातील सोयाबीन पेटवून दिले. आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे . जिल्ह्यात शेतकऱयांचे परतीच्या पावसाने कंबरडे मोडले आहे . सरकारी निकष बदलून शेतकऱयांना सरसकट मदत देणे गरजेचे आहे . अन्यथा जिल्ह्यातील शेतकरी पुरता कोलमडून जाईल .