*शिवराया विद्यार्थी संघटनेचे विदर्भातील ६२ आमदारांना पत्र….*
*हिवाळी अधिवेशन नागपुरातच घ्या-विद्यार्थीमित्र नितीन सेलकर…

*हिवाळी अधिवेशन नागपुरातच घ्या-विद्यार्थीमित्र नितीन सेलकर…
प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
प्रतिनिधी/अल्लीपुर
स्थानिक शिवराया विद्यार्थी संघटनेच्या वतीने विदर्भातील ६२ आमदारांना पत्र पाठविण्यात आले असून,सदर सर्व आमदारांना हिवाळी अधिवेशन हे नागपुरात व्हावे ही मागणी आपण आमदार या नात्याने राज्यशासनाकडे रेटून धरावी अशा आशयाचे पत्र शिवराया विद्यार्थी संघटने कडून पाठविण्यात आले आहे,एकिकडे मागील वर्षांपासून कोरोना महामारीचे कारण सांगत राज्य सरकार नागपूर करारावर अन्याय करताना दिसत आहे,यावर्षी सुद्धा अशीच काही कारणे देत राज्य सरकार व विरोधी पक्षनेते अधिवेशन मुंबईतच घेण्यासाठी इच्छुक आहे,विदर्भातील गावातल्या माणसाच्या अडचणी कडे कुठे तरी कानाडोळा होताना दिसत आहे विदर्भातील गाव-खेड्यातला माणूस हा आपल्या समस्या घेऊन मुंबईत पोहचू शकत नाही,करीता विदर्भातील ६२ ही सर्वपक्षीय आमदारांनी हे अधिवेशन नागपुरात व्हावे ही मागणी रेटून धरावी अशी विनंती पत्र शिवराया विद्यार्थी संघटनेचे मार्गदर्शक व माजी विद्यमान सरपंच गजानन नरड व कैलास घोडे यांच्या मार्गदर्शनात तर संस्थापक,अध्यक्ष विद्यार्थीमित्र नितीन सेलकर यांच्या नेतृत्वात देण्यात आली आहे,यावेळी उपाध्यक्ष विकास गोठे,सचिव मयूर डफ,श्रुनय ढगे,रोशन नरड,निशांत लांभाडे,प्रज्वल डफ,हृषीकेश कोमुजवार,खुशाल दौलतकार,प्रवक्ते प्रतीक थुल,सूरज मेसरे,संदीप नेवारे उपसरपंच अलमडोह, मोहन पंधरे,नितेश पोहाने, नवनाथ येलके, वैभव घंगारे, पवन ढगे,दर्शन कलोडे, सूरज डफ,व सर्व कार्यकर्ते उपस्तीत होते…