*महाआघाडी सरकारने ओबीसी वर अन्याय केला
ओबीसी आरक्षणलागू होईपर्यंत निवडणुका पुढें ढकलण्यात याव्या

ओबीसी आरक्षणलागू होईपर्यंत निवडणुका पुढें ढकलण्यात याव्या
राहुल भोयर ब्रम्हपुरी मो.9421815114
ओबीसी चे 27%आरक्षण महाआघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले.केंद्रासरकारने इंपेरिकल डाटा पुरविला नाही अशी ओरड करण्यापेक्षा 15 महिन्यापूर्वी मा सर्वोच्य न्यायालयाने बजावल्या नंतर सुद्धा आघाडी सरकारने राज्य ओयोगाचे गठन केले नाही तर गठन झाल्या नंतर राज्य मंत्रिमंडळाने आयोगाची 450 कोटी ची गरज पूर्ण केली नाही .परिणामी राज्य मागासवर्गीय आयोग इंपेरीकल डाटा तयार करू शकले नाही .यासाठी राज्यातील महाआघाडी सरकार जबाबदार आहे म्हणून शेवटी ओबीसी च्या जागांवरील निवडणूकिला स्थगिती देऊन राज्य निवडणूक आयोगाने काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करून ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे व ओबीसी वर अन्याय केला आहे त्यामुळे भाजपा ओबीसी मोर्चा ची मागणी आहे की घोषित सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडनूका रद्द करण्यात याव्यात म्हणून मा. राज्यपाल महोदय यांना ब्रम्हपुरीचे तहसीलदार यांचे मार्फत निवेदन देण्यात आले. या प्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा प्रकाश बगमारे,जि प सदस्य कृष्णा सहारे,ओबीसी मोर्चा ब्रम्हपुरी ता. अध्यक्ष प्रेमलाल धोटे,ब्रम्हपुरी शहर अध्यक्ष प्रा अशोक सालोटकर उपस्थित होते.