ओबीसी प्रवर्गाच्या निवडणुका रद्द उमेदवारांना नाराजी

46

*ओबीसी प्रवर्गाच्या निवडणुका रद्द उमेदवारांना नाराजी

ओबीसी प्रवर्गाच्या निवडणुका रद्द उमेदवारांना नाराजी
ओबीसी प्रवर्गाच्या निवडणुका रद्द उमेदवारांना नाराजी

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
7620512045

भंडारा जिल्ह्यात २१ डिसेंबरला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होणार आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गाला दिलेल्या आरक्षणाला हरकत घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीतील ओबीसी प्रवर्गातील निवडणुका रद्द झाल्या आहेत. अन्य प्रवर्गातील निवडणुका निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार होत आहेत. ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांमध्ये यामुळे मोठी नाराजी झाली आहे. निवडणुकीमध्ये चुल्हाड, सिहोरा, गर्रा, कांद्री, डोंगरगाव, वरठी लाखोरी, मुरमाडी (सा), केसलवाडा (बाघ), मुरमाडी(तुप) सिल्ली ,ब्रम्ही, भुयार या जिल्हा परिषद क्षेत्राचा समावेश आहे. तर, साखळी, अंबागड ,खापा माडगी, देव्हाडी, पाचगाव, पालोरा, मोहगाव (देवी), कुंभली, वहद, सानगडी, सालेभाटा, केसलवाडा (बाघ). किटाडी, कोथूर्णा धारगाव खोकरला, कोंढी, पहेला, चिचाळ, पिंपळगाव, कोदूल, मासळ भागडी, पिपळगाव (को) या पंचायत समिती गणाचा समावेश आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तथा नगरपंचायतचे सोमवारला उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले आणि सायंकाळी सर्वोच न्यायालयाचा निर्णय आला. त्यामुळे उमेदवारासह त्यांच्या समर्थकांची धडधड वाढली. सोमवारला निवडणूक आयोगाचा ओबीसी प्रवर्गातील निवडणुका रद्द करण्यात आल्याचे आदेश धडकल्याने ओबीसी प्रवर्गामध्ये कमालीचा रोष व्यक्त होत आहे.