सीडीएस बिपीन रावतसह भारतीय सैन्यदलातील शहीदांना श्रद्धांजली

46

*सीडीएस बिपीन रावतसह भारतीय सैन्यदलातील शहीदांना श्रद्धांजली

सीडीएस बिपीन रावतसह भारतीय सैन्यदलातील शहीदांना श्रद्धांजली
सीडीएस बिपीन रावतसह भारतीय सैन्यदलातील शहीदांना श्रद्धांजली

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा. भंडारा

लाखणी :-भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे धाडसी निर्णयांसाठी आणि धोरणात्मक नियोजनासाठी ओळखले जाणारे शूरवीर राष्ट्राचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत त्यांच्या पत्नीसह अन्य ११ भारतीय सैन्यदलातील व्यक्तींनी हेलिकॉप्टर अपघातात वीरगती प्राप्त केली. या शहीद वीरांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शुक्रवार रोजी तुमसर शहरातील नेहरू मैदानाच्या हुतात्मा स्मारक येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थना केली.
यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम, शाखा प्रमुख निखील कटारे, रोशन निखाडे, मनीष गुरवे, मगेश्वर वाघाये, निशांत ताजने, मेहताब शेख, धम्मदीप सुर्यवंशी, दीपक सराटे, पूर्वेस करंबे, शुभम तांडेकर, जितेश भवसागर, श्रेयस गभने, तुषार कटारे, दीपक मलेवार, यश वैद्य, उदित शर्मा, गजेंद्र बडवाईक, अरुण डांगरे सह शिवसैनिक उपस्थित होते.