शहापूर आरोग्य केंद्राला कायाकल्प पुरस्कार

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
लाखणी:-राज्य शासनाच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात येणाऱ्या कायाकल्प पुरस्कार योजनेत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शहापूरची निवड झाली आहे. दोन लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. 2020-21 या स्पर्धेत राज्यातील अनेक सरकारी रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र सहभागी झाली होती. यात 86, 90 टक्के गुण मिळवून शहापूर प्राथमिक आरोग्य केंद्राने जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढा, मुरमाडी (तुपकर), सानगडी, सालेभाटा, पिंपळगाव (सडक), कुडेगाव, गोंडउमरी, नाकाडोंगरी, विर्शी, पहेला व एकोडी (किन्ही) असे एकूण अकरा प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रोत्साहन पुरस्कार म्हणून प्रत्येकी 50 हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे. तसेच रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालय तुमसर व ग्रामीण रुग्णालय सिहोरा यांना सुद्धा कायाकल्प कार्यक्रमांतर्गत प्रोत्साहन पुरस्कार म्हणून प्रत्येकी एक लाख रुपये प्राप्त झाले आहे. साधारण दोन वर्षांच्या कालखंडात कोरोनामुळे सर्वत्र आरोग्ययंत्रणेवर प्रचंड ताण होता. तरी देखील या यंत्रणांनी स्वच्छता, तरी देखील या संसर्ग नियंत्रण, कचरा व्यवस्थापनामध्ये रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. बाळबुध्दे, डॉ. घोरमारे व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष लक्ष परविले. यानिमित्त जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून आरोग्य उपसंचालक , डॉ. संजीव जयस्वाल यांनी या सर्व चमचे अभिनंदन केले आहे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. माधुरी माथुरकर, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. निखिल डोकरीमारे, जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. अश्विनी वाघे, जिल्हा आयुष्य अधिकारी डॉ. भास्कर खेडीकर, जिल्हा गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम सहाय्यक नलु पडोळे व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी यांचा पुरस्कारात मोलाचा वाटा आहे.