नागपुर येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय राज्यस्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन.

47

नागपुर येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय राज्यस्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन.

नागपुर येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय राज्यस्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन.
नागपुर येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय राज्यस्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन.

✒ युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲9923296442

नागपूर :- कोरोना विषाणुच्या प्रार्दुभावामुळे नागपूर जिल्ह्यातून अनेक मजूर, कामगार वर्ग औद्योगिक आस्थापनेवरुन स्वग्रामी स्थानांतरीत झाले. औद्योगिक आस्थापनामध्ये कुशल व अकुशल मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला. या कामगारांच्या स्थानांतरामुळे अनेक औद्योगिक आस्थापनेवर सद्यस्थितीत रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने कुशल व अकुशल कामगारांसाठी कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या वतीने 12 ते 17 डिसेंबर दरम्यान पंडीत दिनदयाल उपाध्याय राज्यस्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. गरजु बेरोजगार उमेदवारांनी विभागाच्या संकेतस्थळावर तत्काळ नोंदणी करुन मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्र.गं. हरडे यांनी केले आहे.

नागपुर जिल्हातील औद्योगिक आस्थापनांनी सुध्दा www.rojgar. mahaswayam.gov.in संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने सहभागी होऊन या मेळाव्यात मुष्यबळ मागणीसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. या मेळाव्यात गंवडी, सुतारकाम, फिटर, बार वेडिंग व फिक्सींग करणारे, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, वायरमन, सीएनसी ऑपरेटर, मशिनिस्ट,अकुशल कामगार, आरोग्य, पॅरामेडीकल, मॉल्स, आटोमोबाईल, बँकींग, हॉटेलींग, ट्रांन्सपोर्टींग, ट्रावल अँड टुरिझम क्षेत्रातील स्टाफ आदी विविध प्रकारची पदे भरावयाची आहे. दहावी, बारावी आय.टी.आय. पॉलीटेक्नीक उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन विभागाद्वारे करण्यात आले आहे.

या नोंदणी करण्यास अडचणी आल्यास किंवा अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 0712-2531213 या दुरध्वनी क्रमांकावर ज्योती वासुरकर, मार्गदर्शन अधिकारी मनिष कुदळे, जिल्हा समन्वयक योगेश कुटे यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती देण्यात आली.