नागपुर येथे दृष्टिहीन व्यक्तींची बुध्दिबळ स्पर्धा संपन्न.

✒युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲9923296442
नागपूर :- जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने पुनर्वास आणि दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्राच्या वतीने दृष्टिहीन व्यक्तींसाठी बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन नुकतेच केले होते. कोविड संसर्ग कालावधीत दृष्टिहीन व्यक्तींना स्पर्धेसाठी मर्यादित प्रवेश असल्याने ते बराच काळ त्यांच्या घरात होते. या स्पर्धेने त्यांची खेळ भावना अनेक दिवसांनी कायम ठेवण्यात यश आहे. या बुध्दिबळ स्पर्धेत 16 स्पर्धेकांनी सहभाग नोंदविला होता.
प्रख्यात आंतरराष्ट्रीय टेनिसपटू व पंच मंगेश भोपकर, मुकबधीर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. मिनल सांगोले,पुनर्वास व दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्राचे संचालक प्रफुल्ल शिंदे, ध्यानज्योती अंध विद्यालयाचे कला व क्रीडा प्रशिक्षक श्री. चाफेकर, सुषमा वंजारी, श्री. उपासनी यावेळी उपस्थित होते.
मान्यवरांनी क्रीडा क्षेत्रात दृष्टिहीन खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शन केले. शासनाने दिव्यांग व्यक्तीसाठी क्रीडा शिक्षक म्हणून नियुक्त केलेल्या तसेच विविध खेळांमध्ये कलागुण दाखवून राज्य व राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या दिव्यांग विद्यार्थांचा मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला
या स्पर्धेचे पंच म्हणून श्री. चाफेकर यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र मेश्राम यांनी तर उपस्थितांचे आभार अभिमुखता व गतिशिलता विभागाचे मोहम्मद अस्लम खान यांनी मानले.