भद्रावतीचे लाचखोर तहसीलदार डॉ. नीलेश खटके एसीबी च्या जाळ्यात.

54

भद्रावतीचे लाचखोर तहसीलदार डॉ. नीलेश खटके एसीबी च्या जाळ्यात.

             ==== मुख्य मुद्दे ====
● 25 हजाराची लाच घेताना रंगेहात अटक.
● रेतीचे प्रकरण भोवले

भद्रावतीचे लाचखोर तहसीलदार डॉ. नीलेश खटके एसीबी च्या जाळ्यात.
भद्रावतीचे लाचखोर तहसीलदार डॉ. नीलेश खटके एसीबी च्या जाळ्यात.

भद्रावती:- चंद्रपुर जिल्हातील भद्रावती येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. भद्रावतीचे लाचखोर तहसीलदार डॉ. नीलेश खटके यांना लाच घेतल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. त्यामूळे संपुर्ण चंद्रपुर जिल्हातील शासकीय प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

भद्रावतीचे लाचखोर तहसीलदार डॉ. नीलेश खटके हे रेतीची वाहतूक करणाऱ्याकडून हप्ता वसुली करीत होते. या लाचखोर तहसिलदाराने आपल्या भ्रष्ट्राचार आणि लाचखोरीतून अमाप धन कमावल्याचे सूत्रांकडुन माहिती प्राप्त झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार एका व्यक्तीची रेतीची गाडी पकडल्या नंतर ती सोडविण्यासाठी तहसीलदार खटके पैशाची मागणी करीत होते. अधिकारी लाचखोर झाल्यामुळे प्रामाणीक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे संबंधित व्यक्तीने तहसीलदार यांची मस्ती जिरवायचा निर्णय घेऊन चंद्रपूर लाचलुचपत विभागाला माहिती दिली आणि ठरल्याप्रमाणे तब्बल 25 हजाराची लाच घेताना भद्रावती येथे अटक करण्यात आली.

याअगोदर चंद्रपुर जिल्हतील ब्रम्हपुरी येथे नायब तहसीलदार असताना डॉ. नीलेश खटके यांनी अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्यांकडून पैसे घेऊन त्या विरोधात तक्रारी करणाऱ्या मनसे तालुका अध्यक्ष सूरज शेंडे यांच्या विरोधात स्थानिक पोलीस स्टेशन मधे खोटी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता मात्र तत्कालीन ठाणेदार यांनी अशा खोट्या तक्रारी मी घेत नाही सबळ पुरावे आणा असे म्हणून तहसीलदार खटके यांना हुसकावून लावले होते. यानंतर पोम्भूर्ना येथे तहसीलदार असताना सुद्धा अनेक सातबारा फेरफार व इतर प्रकरणात शेतकऱ्यांकडून पैसे घेणाऱ्या डॉ. नीलेश खटके यांच्या विरोधात उपविभागीय अधिकारी गोंडपिंपरी यांच्याकडे तक्रारी आहेत आणि आता ते एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने आता त्या प्रकरणात सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे.