नागपुर मध्ये विषारी इंजेक्शन टोचून महिला डॉक्टरने केली आत्महत्या, सुसाईट नोटमध्ये लिहल आत्महत्येचे कारण.

57

नागपुर मध्ये विषारी इंजेक्शन टोचून महिला डॉक्टरने केली आत्महत्या, सुसाईट नोटमध्ये लिहल आत्महत्येचे कारण.

नागपुर मध्ये विषारी इंजेक्शन टोचून महिला डॉक्टरने केली आत्महत्या, सुसाईट नोटमध्ये लिहल आत्महत्येचे कारण.
नागपुर मध्ये विषारी इंजेक्शन टोचून महिला डॉक्टरने केली आत्महत्या.

✒️ युवराज मेश्राम ✒️
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲9923296442
नागपूर:- नागपुर येथील जरीपटका परिसरातुन एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका महिला डॉक्टरने विषारी इंजेक्शन स्वतःला लाहून आपली जिवन यातना संपविल्याच्या घटनामुळे सर्वीकडे एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापुर्वी सुसाईट नोटमध्ये त्यांनी आपल्या आत्महत्येचे कारण लिहिले. कोणताही डॉक्टर माझे उपचार करून शकत नाही. त्यामुळं मी आत्महत्या करीत असल्याचं त्यांनी सुसाईट नोटमध्ये लिहीलं.

दि. 9 डिसेंबर ला रात्री ही घटना समोर आली आहे. आकांक्षा मेश्राम वय 34 वर्ष असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचं नाव आहे. रात्री नऊ वाजले तर डॉ. आकांक्षा या खोलीबाहेर पडल्या नाहीत. त्यामुळं त्यांच्या आईवडिलांनी त्यांची खोली गाठली. पाहतात तर काय त्या बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडल्या होत्या. बाजूलाच चार-पाच सिरींज होत्या. त्यातील दोन रिकाम्या होत्या. आईवडिलांनी डॉक्टरांना बाहेरून बोलावले. डॉक्टरांनी आकांशा मृत असल्याचं सांगितलं. तेव्हा आईवडिलांच्या पायाखालची जमीनच घसरली.

एमबीबीएस, एमडी केल्यानंतर 2016 मध्ये आकांक्षाचे लग्न झालं. त्या सोलापुरात सरकारी रुग्णालयात नोकरी करायच्या. वैवाहिक जीवनात कटुता आल्यानं आकांक्षा आणि त्यांच्या पतीने परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, कोरोनाची पहिली लाट आली. त्यामुळं आकांक्षा नागपुरातल्या जरीपटक्याच्या नागसेननगरातील वडिलांच्या निवासस्थानी वरच्या माळ्यावर राहत होत्या.

आत्महत्येपूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवली. त्यात त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. आपली व्यथा मांडताना कोणताही डॉक्टर माझ्यावर उपचार करू शकत नाही. माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, असे सुसाईट नोटमध्ये लिहिले. वैवाहिक जीवन संपुष्ठात आल्यानंतर आकांशा नैराश्यात गेल्या होत्या. या नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे.

घटनेची माहिती मिळताच जरीपटक्याचे ठाणेदार वैभव जाधव यांनी घटनास्थळ गाठले. पीएसआय नाईकवाडे हेही पोहचले. मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर नेमके कारण समजेल. सध्या पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. वैद्यकीय अहवालानंतर गुन्ह्याचे स्वरूप स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं.