वर्ध्या जिल्हात आणखी एका शेतकर्‍याने नापिकीमुळे कवटाळले मृत्युला.

53

वर्ध्या जिल्हात आणखी एका शेतकर्‍याने नापिकीमुळे कवटाळले मृत्युला.

वर्ध्या जिल्हात आणखी एका शेतकर्‍याने नापिकीमुळे कवटाळले मृत्युला.
वर्ध्या जिल्हात आणखी एका शेतकर्‍याने नापिकीमुळे कवटाळले मृत्युला.

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
वर्धा/देवळी:- वर्धा जिल्हातील देवळी तालुक्यातुन एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. दापोरी येथील शेतकरी अनिल झण्णाबापू कामनापुरे वय 40 वर्ष यांनी नजीकच्या शेतशिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या शेतीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पाच लाखाचे असून गेल्या तीन वर्षांपासूनच्या सततच्या नापिकीमुळे ते त्रस्त असल्याचे सांगितले जात आहे. पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय कामनापुरे यांचे ते कनिष्ठ बंधू आहे.

तहसीलदार राजेश सरवदे व गाव साज्याचे पटवारी यांनी सदर घटनेची माहिती घेऊन याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे. मृतकाचे पश्चयात पत्नी, मुलगी व बराच मोठा आप्तपरीवार आहे. मोक्षधाम येथे त्यांचे पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.