वर्धेतील वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या अळ्या.

✒️ प्रशांत जगताप ✒️
कार्य संपादक मिडिया वार्ता न्युज
📲 9766445348📲
वर्धा :- वर्धा जिल्हातील सावंगी मेघे येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. वर्धा शहराला लागुन असलेल्या सावंगी मेघे येथील सरस्वती मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणात आणि नास्त्यात अळ्या सापडल्याचे समोर येताच सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार एक दिवसाचा नाही तर दररोज जेवणात अळ्या निघत असल्यानं विद्यार्थाना उपाशी राहावं लागत असल्याचे विद्यार्थानी माहिती दिली.
जेवनात अशा पद्धतीने अळ्या युक्त जेवन दिल्या जात असल्याने सरस्वती वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झालाय. गेल्या एक महिन्यापासून हा प्रकार अधून मधून घडत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जेवन पुर्वणा-या मेस व्यवस्थापना कडे या बाबत तक्रार केल्यानंतरही कोणतीच कारवाई न झाल्याने विद्यार्थी संतप्त झालेत.
सावंगी मेघे येथील या सरस्वती वसतिगृहात अनेक अभ्यास क्रमाचे शिक्षण ए.एन.एम, जी.एन.एम, बी.एस.सी आणि फार्मसीचे शिक्षण घेणारे शेकडो विद्यार्थी आहेत. सावंगी मेघे येथील सरस्वती वसतिगृहात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी विदर्भातून येतात. 6,450 रुपये प्रति महिना जेवणाचा खर्च होतो. सोयी सुविधेच्या नावांवर विद्यार्थांना अळ्यांचे जेवण आणि नास्ता मिळत असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये वसतिगृह प्रशासनाविरोधात चांगलाच रोष दिसून येतोय.