बोरगाव मंजू येथील इब्राहीम शाह इंडियन आर्मीत भरती झाल्यामुळे ठाणेदार गवळी यांनी केला सत्कार.

62

बोरगाव मंजू येथील इब्राहीम शाह इंडियन आर्मीत भरती झाल्यामुळे ठाणेदार गवळी यांनी केला सत्कार.

 ठाणेदार हरीश गवळी इब्राहीम शाह याचा सत्कार करताना.

सिद्धार्थ पाटील

अकोला:-  बोरगाव मंजू येथील इब्राहिम शाह साबीर शाह हा अतिशय गरीब कुटूंबातील, असून तो त्यांच्या वडीला सोबत आठवडी बाजारात पान विकण्याचे काम करत होता.त्याच बरोबर त्याने अभ्यास करून जिद्द कायम ठेवली, आणि इंडियन आर्मीत आपण भरती व्हावे असा कयास करून अखेर त्यांनी आर्मीतील परीक्षा उत्तीर्ण करून भारतीय सेन्यात भरती झाला. त्या बद्दल बोरगाव मंजू येथील ठाणेदार हरीश गवळी यांनी इब्राहिम शाह,साबीर शाह याचा शाल देऊन सत्कार केला, यावेळी ग्रामसेवक संदीप गवई, सामाजिक कार्यकर्ते सनाउल्ला शाह, पत्रकार मोहमद शारीख,उपस्थित होते.दरम्यान बोरगाव मंजू येथून पहिल्यादा मुस्लिम समाजातील युवक हा इंडियन आर्मीत भरती झाला असल्याने मुस्लिम समाजातीळ त्याच्या मित्र परिवारात उत्साहाचे वातावरण आहे