हिंगणघाट नगर परिषदेच्या १५४ कोटी रुपयांच्या कामांचा श्री गणेश नितीन गडकरी यांच्या हस्ते

51

हिंगणघाट नगर परिषदेच्या १५४ कोटी रुपयांच्या कामांचा श्री गणेश नितीन गडकरी यांच्या हस्ते

हिंगणघाट नगर परिषदेच्या १५४ कोटी रुपयांच्या कामांचा श्री गणेश नितीन गडकरी यांच्या हस्ते
हिंगणघाट नगर परिषदेच्या १५४ कोटी रुपयांच्या कामांचा श्री गणेश नितीन गडकरी यांच्या हस्ते

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
हिगनाघाट १३/१२/२१ हिंगणघाट नगर परिषदेच्या १५४ कोटी रुपयांच्या कामांचा श्री गणेश नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी ग्रामीण भागात टेक्नॉलॉजी आणण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी आपल्याला उद्योगशीलता वाढवावी लागेल. विविध प्रकल्पातून रोजगाराची निर्मिती कशी होईल याचा विचार केला पाहिजे.
गरिबांना जात, धर्म, पंथ, भाषा नसते. त्यांना केवळ विकासाचीच भूक असते आणि त्यासाठी रोजगार निर्मितीची गरज असून सिंदी (रेल्वे) येतील प्रस्तावित ड्रायपाेर्टमुळे वर्धा जिल्ह्यात २५ हजार रोजगाराची निर्मिती होणार आहे. मागील पाच वर्षात हिंगणघाट शहराचा चेहरा बदलला असून याचे पूर्ण श्रेय आमदार कुणावार व नगराध्यक्ष बसंतानी तसेच संपूर्ण नगरसेवक आणि न.प. कर्मचाऱ्यांचे असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी व्यासपीठावर खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, आ. डॉ. रामदास आंबटकर, नगराध्यक्ष प्रेम बसंतांनी, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे आदींची उपस्थिती होती.
खा. रामदास तडस यांनी हिंगणघाट रेल्वे स्थानकावर थांबा नसलेल्या रेल्वे गाड्यांना तातडीने थांबा मिळावा अशी मागणी यावेळी केली. संचालन मंजूषा ठाकरे व दत्तात्रय पवार यांनी केले. आभार मुख्याध्यापक गंगाधर ढगे यांनी मानले. कार्यक्रमाला गिमा टेक्स इंडस्ट्रीजचे प्रशांतकुमार मोहता, विद्या भारतीचे प्रदेश अध्यक्ष रमेश धारकर, ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषाकिरण थुटे, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती वसंत आंबटकर, माजी नगराध्यक्ष सुरेश मुंजेवार, जि. प. सभापती माधव चंदनखेडे, रिपाइंचे शंकर मुंजेवार आदींची उपस्थिती होती.