कळमेश्वर येथील ब्राहाणी फाटा चौकात शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

✒युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
📲9923296442
कळमेश्वर:- तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अविनाश गोतमारे, युवराज मेश्राम नागपूर जिल्हा सरचिटणीस, भुजंग मोजनकर, बबन वानखेडे, रशीद शेख, मायाताई गणोरकर, श्रीराम भिवगडे, खुशाल मंडलिक, सोनाली गोडाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलित करून व केक कापून शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने संपुर्ण महाराष्ट्रात शरद पवार यांच्या वाढदिवसा निमीत्ताने मुंबई वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सुनीलभाऊ केदार पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, कळमेश्वर पंचायत समितीचे सभापती श्रावण दादा भिंगारे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती प्रतिभाताई पालकर, राजेंद्र जिचकार, राजू सुके, संजु मंडपे व अनेक कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्त्यांनी भेटी देण्यात आल्या.
या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात युवराज मेश्राम, भुजंग मोजनकर, बबन वानखेडे, रशीद शेख, मायाताई गणोरकर, बंडूभाऊ शेंडे, संदीप मोहोळ, अरुण जुमडे, नंदकिशोर पाटील, दिवाकर कडू, विशाल मंडलिक, सोनालीताई गोंडाणे, शुभम काळे, जीवन बाकडे, निलेश जुनघरे, कैलास सुरतकर, चंद्रशेखर श्रीखंडे, कुणाल शेंडे, मोरेश्वर इंगोले, सुमित चौधरी, इरफान शेख, प्रमोद देवकर, गौरीताई डोंगरे, नंदू वराडे सह तालुक्यातील बहुसंख्य राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी शेकडो लोकांनी रक्तदान करुन आपली सामाजिक जबाबदारी पार पाडून रक्तदान केले. या कार्यक्रमाला बहुसंख्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश गोतमारे यांचा कळमेश्वर तालुक्याच्या वतीने जाहिर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती युवराज मेश्राम, भुजंग मोजकर, मायाताई गणोरकर, सोनाली गोडाणे, फत्तेसिंग मरडवार प्रमुख्याने उपस्थीत होते.