विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्यावतीने कळमेश्वर येथे कलावंताचा मेळावा संपन्न.
पशुसंवर्धन क्रीडा युवक कल्याण मंत्री सुनील बाबू केदार यांचे हस्ते कलावंताच्या मेळाव्याचे उदघाटन.

पशुसंवर्धन क्रीडा युवक कल्याण मंत्री सुनील बाबू केदार यांचे हस्ते कलावंताच्या मेळाव्याचे उदघाटन.
✒युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
📲 9923296442 📲
नागपुर/कळमेश्वर:- विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्यावतीने कळमेश्वर येथे कलावंताचा मेळावा आयोजित केलेला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे केंद्रीय सचिव अलंकार जी टेंभुर्णे तर उद्घाटन पशुसंवर्धन क्रीडा युवक कल्याण मंत्री सुनील बाबू केदार हे होते यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. राजीवजी पोद्दार महाराष्ट्र सदस्य भाजपा. वृद्ध कलावंत मानधन समितीचे माजी अध्यक्ष राजकुमार घुले साहेब. वृद्ध कलावंत मानधन समितीचे माजी सदस्य मनोहरजी धनगरे . वृद्ध कलावंत मानधन समितीचे माजी सदस्य दयालजी कांबळे, वृद्ध कलावंत मानधन समितीचे सदस्य रामेश्वरजी दंडारे, वृद्ध कलावंत मानधन समितीचे सदस्य सचिन ढोणे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नागपूर जिल्हा अध्यक्ष नरेंद्रजी डोंगरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, काटोल तालुक्याचे विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तायवाडे, विदर्भ शाहीर कलाकार परिषद चे हिंगणा तालुक्याचे अध्यक्ष पुरुषोत्तमजी निगोट, केंद्रीय महिला प्रतिनिधी विद्याताई लंगडे, केंद्रीय महिला प्रतिनिधी निशा ताई खडसे, विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे मार्गदर्शक मनिष धर्मदास भिवगडे, नगर परिषद कळमेश्वर च्या उपाध्यक्ष जोशनाताई सर्जू मंडपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सांस्कृतिक विभाग नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रभू अंभोरे साहेब, खरेदी विक्री सहकारी संस्थेचे अध्यक्ष बाबा कोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती प्रतिभाताई पालटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य व सेलू ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रदीप चणकापूरे, नगर परिषद कळमेश्वरचे सदस्य सत्यवानजी मेश्राम, सुवर्णाताई मानकर, अश्विनीताई धोंगडी, सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ काकडे, गंगाधर नागपुरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले व पाहुण्यांना प्रमाणपत्र त्याच प्रमाणे शील प्रदान करण्यात आली. आदरणीय राजकुमार घुले, आदरणीय प्रभु अंभोरे, आदरणीय नरेंद्रजी डोंगरे यांनी कलावंतांना मार्गदर्शन केले. नामदार सुनील बाबू केदार आपल्या भाषणात म्हणाले, कलावंतांना सर्वतोपरी न्याय देण्याचा मी प्रयत्न करीन, तुमच्या अनेक समस्या शासन दरबारी सोडवण्याचा प्रयत्न करील आणि कोरोनाच्या काळा नंतर या नागपूर जिल्ह्यामध्ये हा कलावंताचा मेळावा कळमेश्वर येथे मोठ्या थाटामाटाने घेण्यात येत आहे त्यामुळे, मी आयोजकांचे अभिनंदन करतो असे ते म्हणाले कार्यक्रमाचे आयोजन विदर्भ शाहीर कलाकार परिषद तालुका कळमेश्वर यांच्यावतीने करण्यात आले.
या मेळाव्यात हनुमान भजन मंडळ पिपळा किनखेडे ,महा मुक्ताई महिला दंडार मु. डोमा तालुका चिमूर, संत सावता महिला भजन मंडळ पिपळा किनखेडे, नामदेवराव कुहीटे महाराज यांचे कीर्तन, हरी कृपा भजनी मंडळ ब्राह्मणी, जय सच्चिदानंद महिलामंडळ बुरुजवाडा, वासुदेवराव गौरखेडे महाराज यांचे कीर्तन, न्यू झंकार महिला दंडार आंबेगिरी चिमूर, विठ्ठल रुक्मिणी महिला भजन मंडळ पिपळा किनखेडे,
मिराबाई वानखेडे भारसिंगी,
हनुमान भजनी मंडळ सिल्लोरी, रामायण भजन मंडळ धापेवाडा, सद्गुरू महिला भजन मंडळ ब्राह्मणी तुळजा भवानी भजन मंडळ धापेवाडा, संस्कृती बहुउद्देशीय मंडळ तिरंगी,
शिलाबाई सोनटक्के यांचे भिम गित, श्रीकृष्ण युवा भजन मंडळ,
स्वामी भजन मंडळ, परमेश्वर गुरुदेव भजन मंडळ चिमूर, गुरुदेव सेवा भजन मंडळ कोकर्डा, कांचन ठाकूर आणि संच यांचा स्वरांजली ग्रुप यांचा कार्यक्रम, गोपाळ कृष्ण भजन मंडळ ब्राह्मणी, चिंतामणी गजभिये मंडळ या सर्वांनी आपली कला प्रदर्शीत करुन आपली भजने गीत गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सुंदर संचालन विदर्भ शाहीर कलाकार परिषदचे तालुकाध्यक्ष अरुणभाऊ वाहाने यांनी केले. प्रस्ताविक ब्राह्मणी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच गंगाधर नागपुरे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी ते करता वृद्ध कलावंत मानधन समितीचे सदस्य मनोहरजी धनगरे, विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव ठाकरे, विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावंडे, प्रभाकर निंबाळकर, प्रभा निंबाळकर, निर्मलाताई माहुरकर, उर्मिला ताई वाडी, रामदास मानेराव गुरुजी, भाऊरावजी खोबरे, मारुती टेकाडे, शेषरावजी चरजण, बापूराव धनगरे, हंसराज साकोडे, सुरेश इंगळे, विठ्ठल नेरकर, लीला पाल, प्रमिला धनगरे, मधुकर खाटके, चंद्रकला वाघमारे, अशोकराव लोणारे, शेख ताज, युवराज कुथे, नामदेव मोहतकर, अनुजा निंबाळकर, निशाताई खडसे, रुक्माबाई धोटे, शकुंतला बाई मोमते, प्रभाताई धनगरे, जीवतू दुर्गे, पुरुषोत्तम कुंभे यांनी अथक परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे गौरीशंकर गजभिये यांनी केले. सर्व कलावंत करता जेवणाची व्यवस्था विदर्भ शाहीर कलाकार परिषद तालुका कळमेश्वरच्या वतीने करण्यात आली होती.