पंचायत समिती नागभीड अंतर्गत जागतिक दिव्यांग समता दिन साजरा

61

पंचायत समिती नागभीड अंतर्गत जागतिक दिव्यांग समता दिन साजरा

पंचायत समिती नागभीड अंतर्गत जागतिक दिव्यांग समता दिन साजरा
पंचायत समिती नागभीड अंतर्गत जागतिक दिव्यांग समता दिन साजरा

✒क्रीष्णा वैद्य✒
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी 9545462500

नागभीड :- कोवीड -19 नंतरच्या या सर्वसमावेशक, शाश्वत जगात दिव्यांग विद्यार्थ्यांचा इतर विद्यार्थ्यांमध्ये समावेशन करणे, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देवून नेतृत्व कौशल्य व सहभाग इ. गुण वृध्दिंगत करून, दिव्यांग विद्यार्थी व पालक यांच्यातील न्यूनगंडाची भावना दूर करून आत्मविश्वास, शैक्षणिक, सामाजिक जागरूकता निर्माण होण्याच्या दृष्टीने पं.स. नागभीड अंतर्गत जागतिक समता/ जागतिक दिव्यांग दिन जि. प. उ. प्रा. शाळा कोर्धा येथे कोरोना च्या नियमांचे पालन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रम हा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जिल्हा चंद्रपूर, मा. प्राचार्य श्री.धनंजय चापले, मा. श्री. दिपेन्द्र लोखंडे शिक्षणाधिकारी (प्राथ.),यांच्या प्रेरणेने तसेच डायटचे जेष्ठ अधिव्याख्याता व नागभीड तालुक्याचे क्षेत्रिय अधिकारी श्री.विनोद लवांडे,गटशिक्षणाधिकारी मा. श्री. पी. नाट यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला मा. गटशिक्षणाधिकारी श्री.नाट साहेब अध्यक्ष तर प्रमुख अतिथी शाळेचे मा. मुख्याध्यापक श्री. डी. भोयर सर, मा. श्री. गजबे सर, श्री. मंदे सर, सौ.छाया साखरकर मॅम, सौ. गायकवाड मॅम, सौ. तलमले मॅम, दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक लाभले.
सदर दिवसाचे औचित्य साधून खालील प्रमाणे कार्यक्रम घेण्यात आले. चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, डान्स स्पर्धा,फॅन्सी ड्रेस, कविता वाचन स्पर्धा, शिक्षक, विद्यार्थी, पालक मुलाखत इ.

विजेत्या स्पर्धकांना मा. ग. शि. अ. श्री. नाट साहेब व सर्व उपस्थितांच्या हस्ते बक्षीस वितरित करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन समावेशित शिक्षण तज्ञ कु. छाया विंचूरकर यांनी केले तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समावेशित शिक्षण तज्ञ श्री. वि.कुंभरे, विशेष शिक्षक श्री. माधव बोरकर, श्री. सतिश कायरकर, कु. प्रेमा अंबादे, कु. विजया
लोखंडे इ. तसेच शाळेतील सर्व स्टाफ, पालक, विद्यार्थी यांनी मोलाची मदत केली.