ब्रम्हपुरी कराटे असोसिएशन, चंद्रपूर जिल्हा आष्टेडु मर्दानी आखाडा असोसिएशन आणि लाईफ फाऊंडेशन सामाजिक संस्था, ब्रम्हपुरी मार्फत “श्रद्धांजली अर्पण” कार्यक्रम साजरा

51

ब्रम्हपुरी कराटे असोसिएशन, चंद्रपूर जिल्हा आष्टेडु मर्दानी आखाडा असोसिएशन आणि लाईफ फाऊंडेशन सामाजिक संस्था, ब्रम्हपुरी मार्फत “श्रद्धांजली अर्पण” कार्यक्रम साजरा

ब्रम्हपुरी कराटे असोसिएशन, चंद्रपूर जिल्हा आष्टेडु मर्दानी आखाडा असोसिएशन आणि लाईफ फाऊंडेशन सामाजिक संस्था, ब्रम्हपुरी मार्फत "श्रद्धांजली अर्पण" कार्यक्रम साजरा
ब्रम्हपुरी कराटे असोसिएशन, चंद्रपूर जिल्हा आष्टेडु मर्दानी आखाडा असोसिएशन आणि लाईफ फाऊंडेशन सामाजिक संस्था, ब्रम्हपुरी मार्फत “श्रद्धांजली अर्पण” कार्यक्रम साजरा

राहुल भोयर ब्रम्हपुरी प्रतिनिधी मो 9421815117

ब्रम्हपुरी:-संपूर्ण भारताला सुन्न करून टाकणारी घटना दि.८ डिसेंबर २०२१ रोजी घडली. ही घटना म्हणजे, तामिलनाडू राज्यात झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात आपल्या भारताचे सी.डी.एस.प्रमुख जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि त्यांचे ११ सहकारी वीर जवान, ह्या दुर्घटनेमध्ये ह्या सर्वांना वीर मरण आले. सदर दुर्घटनेनंतर संपूर्ण भारतात दुःखद शांततेचा वातावरण झाले.

शहिद वीर जवानांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून, ब्रम्हपुरी कराटे असोसिएशन, चंद्रपूर जिल्हा आष्टेडु मर्दानी आखाडा असोसिएशन आणि लाईफ फाऊंडेशन सामाजिक संस्था, ब्रम्हपुरी मार्फत दि.१३ डिसेंबर २०२१ रोजी सोमवरला लोकमान्य टिळक शाळा ब्रम्हपुरीच्या पटांगणावर “श्रद्धांजली अर्पण” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद वीर जवानांच्या भव्यदिव्य फोटोला सर्वांच्या हस्ते पुष्प वाहत, त्यासमोर मेणबत्ती लाऊन, शाहिदांसाठी मौन साधना करण्यात आली. कार्यक्रमाच्या अखेरीस सर्वांनी मिळून “शहीद वीर जवान अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम” असे घोषवारे देत, विशेष श्रद्धांजली वाहिली आहे.

संपूर्ण कार्यक्रमासाठी कराटे असोसिएशनचे मुख्य मार्गदर्शक, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सिहान-गणेश लांजेवार सर, लाईफ फाऊंडेशनचे उदयकुमार पगाडे, पूनम कुथे, सेंसाई सचिन भानरकर, सेंसाई प्रितम राऊत आणि कराटे प्रशिक्षण घेणारे सर्व विध्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.