ब्रह्मपुरी तहसीलदाराची वरिष्ठ पत्रकारास उर्मटपणाची वागणूक न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

52

ब्रह्मपुरी तहसीलदाराची वरिष्ठ पत्रकारास उर्मटपणाची वागणूक

न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

ब्रह्मपुरी तहसीलदाराची वरिष्ठ पत्रकारास उर्मटपणाची वागणूक न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा
ब्रह्मपुरी तहसीलदाराची वरिष्ठ पत्रकारास उर्मटपणाची वागणूक
न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

✒क्रिष्णा वैद्य ✒
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500

ब्रम्हपुरी :- ब्रह्मपुरी शहरला लागूनच असलेल्या ग्रामपंचायत उदापूर येथिल तलावात होत असलेल्या अवैध अतिक्रमणा बाबत दिवाकर मंडपे(पत्रकार)
काही माहिती घ्यायला तहसील कार्यालयात गेले असता त्यांच्याशी तहसिलदार ब्रम्हपुरी यांनी उर्मटपणे बोलत कॅबिन मधून हाकलून दिल्याचा प्रकार तहसील कार्यालय ब्रम्हपुरी येथे घडला.

सविस्तर माहिती याप्रमाणे की,ब्रह्मपुरी शहरला लगतच असलेल्या ग्रामपंचायत उदापूर हद्दीत येणाऱ्या सर्वे नंबर १३७ मधील १ हेक्टर ८१ आर जागेमध्ये तलाव असून या तलावातील पाण्याचा शेतकऱ्यांना सिंचनासाठी तसेच जनावरांना पाणी पिण्यास व जलस्तर कायम ठेवण्यात हा तलाव खूप महत्वाचा आहे. परंतु उदापूर येथील एका व्यक्तीने या तलावामध्ये जे.सी.बी.चे सह्याने बांधकामा साठी खड्डे करून सिमेंट काँक्रिटचे पक्क्या घराचे बांधकाम सुरू केले असल्याने .याबाबत दिनांक ७/१२/२०२१ ला ब्रम्हपुरीचे तहसीलदार उषा चौधरी यांना प्रत्यक्षात भेटून तोंडी व लेखी माहिती दिली तसेच श्रद्धा करकाडे तलाठी यांना सुध्दा महिती दिली.परंतु तहसीलदार ब्रम्हपुरी यांचे कडून कुठलीही कारवाई न झाल्याने, मा. तहसीलदार उषा चौधरी, प्रांत अधिकारी बी.डी.ओ. ठाणेदार ब्रह्मपुरी यांना दिनांक १०डिसेंबर २१ ला याचं संदर्भाने लेखी अर्ज दिले.मात्र सदर अवैध बांधकामावर कुठलीही कारवाई न झाल्याने पुन्हा दिनांक १३डिसेंबर २१ला ४:४५ वाजता अर्जदार दिवाकर मंडपे यांनी काही पत्रकारासह तहसीलदार उषा चौधरी यांचे कॅबिनमध्ये भेट घेत तलावामध्ये होत असलेल्या अवैध बांधकामा बाबत चर्चा केली असता. मा.तहसीलदार यांनी उर्मटपणाने बोलणे सुरू केले व तालुक्यातील एका वरिष्ठ पत्रकारास “तुम्हाला हेच धंदे आहेत काहीतरी कागदावरून रंगवणे व दररोज येणे”
“मी तलाठ्याला सांगितले आहे. मला काय करायचे ते मी करतो ‘तुला काय करायचे ते कर’ मला माहीतच आहे तुम्ही काय करता
अश्या उर्मट भाषेत तहसीलदार यांनी काहीही न ऐकता अर्जदार वरिष्ठ पत्रकार दिवाकर मंडपे व इतर सोबतीतील पत्रकारांना आपल्या कॅबिन मधून बाहेर जायला सांगत अक्षरशः हाकलून लावले.

मा. तहसीलदार ब्रम्हपुरी यांचे कडून झालेल्या असभ्य वर्तवणुकीने, तलावातील अवैध बांधकामास तहसीलदार यांचा आशीर्वाद असल्याचे अभिप्रेत होतं आहे तर तलावातील अवैध बांधकाम बंद न झाल्यास अर्जदार आमरण उपोषण करणार व संबंधितांना कोर्टात खेचणार असे वरिष्ठ पत्रकार दिवाकर मंडपे यांनी सांगितले..