उमेदवारांचा घरोघरी मोर्चा विकासाची कोरडी चर्चा

58

उमेदवारांचा घरोघरी मोर्चा विकासाची कोरडी चर्चा

उमेदवारांचा घरोघरी मोर्चा विकासाची कोरडी चर्चा
उमेदवारांचा घरोघरी मोर्चा विकासाची कोरडी चर्चा

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
7620512045

लाखणी:-जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका 21 डिसेंबरला होवू घातल्या आहेत. आतापर्यंत जनतेपासून आपला पिच्छा सोडवू पाहणारे, समस्या घेवून येणाऱ्या मतदारांपासून दूरुनच पळ काढणारे व त्यांना हुलकावणी देणारे इच्छुक उमेदवारांनी आपला मोर्चा गल्लोगली आणि घरोघरी वळविला असून विकासाच्या नावावर कोरडी चर्चा य आश्वासनांचा लॉलीपॉप दिला जात आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत जनतेची झोळी वांझोटीच राहिली, त्यांच्या समस्या व प्रश्न तसेच आणि तितकेच ज्वलंत आहेत, त्याचे काय? याचा जाब विचारण्याची वेळ आली आहे. पालांदूर जिल्हा परिषद क्षेत्रात आजही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. केवळ वर्चस्ववादाच्या लढाईतच सत्ताधारी व विरोधकांनी विकास कामाकडे केलेले दुर्लक्ष अन् निवडणुकीच्या काळात विकासाच्या मुद्द्यावर होणारी आश्वासनांची खैरात याला मतदार जनता कंटाळली असून जनतेने घेतलेला पावित्रा उमेदवारांना चांगलाच घाम फोडणारा आहे. मूलभूत सुविधेचे काही कळीचे मुद्दे या निवडणूक प्रचारादरम्यान पुढे येणार आहेत. 28 वर्षांच्या अबाधित सत्तेच्या काळात भाजप पालांदूरला तालुक्याचा दर्जा मिळाला नाही. पालांदूर परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणे कोणत्याच राजकारण्याला जमले नाही, ही मोठी शोकांतिका आहे. पालांदूर तालुका व्हावा यासाठी चमकोगिरी करणाऱ्यांनी त्यांच्या हातात असलेल्या ग्रामपंचायतीला विकासाच्या नावावर मोठे भगदाड पाडले आहे. यामुळे विकास कामाला गती आली नाही. विकासकामाची पूर्तता व्हावी आणि ती पूर्णत्वास नेण्यास पालांदूर परिसरातील राजकारणी अपयशी ठरले आहेत. पालांदूर गावातून जाणारा मुख्य रस्ता आजही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.