45 दिवसानंतर ही एसटी कर्मचारी संपावर – मागण्या पूर्ण होईपर्यंत दुखवटा सुरूच राहणार.

53

45 दिवसानंतर ही एसटी कर्मचारी संपावर – मागण्या पूर्ण होईपर्यंत दुखवटा सुरूच राहणार.

45 दिवसानंतर ही एसटी कर्मचारी संपावर - मागण्या पूर्ण होईपर्यंत दुखवटा सुरूच राहणार.
45 दिवसानंतर ही एसटी कर्मचारी संपावर – मागण्या पूर्ण होईपर्यंत दुखवटा सुरूच राहणार.

राहुल भोयर ब्रम्हपुरी शहर प्रतिनिधी मो.9421815114

ब्रम्हपुरी:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना झाल्यापासूनच अनेक एसटी कर्मचारी उपेषित आहेत अशा परिस्थितीतही सातत्यानं हा अन्याय सहन करीत अनेक कर्मचारी कर्तव्य बजावत होते. मात्र सरकारकडून सातत्याने मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाऱ्यांनी राज्यशासनात एसटी कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण करण्याच्या उद्देशाने संप पुकारला मात्र तब्बल पंचेचाळीस दिवस उलटुन गेले तरी मात्र आजतागायत एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. मुख्यत्वे एसटीचा प्रवास सुरक्षित मानला जातो. त्यामुळे एसटी बसने नागरिक जास्त संख्येने प्रवास करतात.आज पर्यंत गाव तिथे एसटी प्रत्यक्षात पोहोचविण्याची संकल्पना खऱ्या अर्थाने चालक आणि वाहक करत आहेत.ऊन वारा पाऊस थंडी यांचा कसलाही विचार न करता एसटी कर्मचारी प्रवाशांना या गावावरून त्या गावाला वाहून नेण्याचे कार्य एसटी कर्मचारी करीत आहेत. राज्यभर एसटी कर्मचारी तन – मन – तान भूक झोप विश्रांती अगदी कुटुंबाकडे दुर्लक्ष करून प्रत्येक कर्मचाऱ्यांनी एसटी साठी स्वतःला वाहून घेतले आंतरजिल्हा , आंतरराज्य प्रवासावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तीनही ऋतूमध्ये सुद्धा एसटीच्या टपावर आपली रात्र काढून तोंडातून ब्र न काढता प्रवाशांना ने आण करण्याची जबाबदारी नेटाने सांभाळत स्वतःची जवाबदारी पूर्ण करून मोलाचे सहकार्य आपल्या आगाराला करीत आहेत. मात्र त्यांना केंद्र व राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे व राज्य शासनात एसटीचे विलिनीकरण करण्यात यावे या मागण्यांकडे राज्य शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने आगारातील एसटी कर्मचारी शासनाच्या निदर्शनास आणून देतांना तब्बल पंचेचाळीस दिवसानंतरही मागणीसंदर्भात संपावर अडून बसले आहेत.त्यामुळे शाळा महाविद्यालयात जाणारे लाखो विद्यार्थी, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक , कामावर जाणाऱ्या शेतकरी, शेतमजूर अशा अनेक गोरगरीब प्रवाशांची एसटी अभावी प्रचंड गैरसोय होत आहे. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी संपकरी कामगारांनी कामावर यावे असे आवाहनही परिवहन मंत्री अँड अनिल परब यांनी केले आहे.याच पार्श्वभूमीवर याचे पडसाद ब्रह्मपुरी आगारातील एसटी कर्मचाऱ्यांवर उमटलेले दिसून येत असून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचा असा दुखवटयाचा लढा अखेरपर्यंत सुरूच राहणार असल्याचे ब्रह्मपुरी आगारातील संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी व्यथा कथन करतांनी सांगितले.