वाशिम भरारी पथकाने बेकायदेशीर वाळूने भरलेले वाहन पकडले.

58

वाशिम भरारी पथकाने बेकायदेशीर वाळूने भरलेले वाहन पकडले.

अनधिकृत गौण खनिज उत्खनन करणारे दक्षता पथकाच्या रडारवर

 भुषण कावडे

वाशिम:-  जिल्ह्यामध्ये मानोरा मोठ्या प्रमाणात नद्या व नाले असून या वर्षी भरपूर पाऊस झाल्याने नदी-नाले वाळूने भरलेली आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी वाळू उत्खननावर शासनाने बंदी घातलेली असल्याचा गैरफायदा तालुक्यातील गौण खनिज माफियांना नव्याने स्थापन करण्यात आलेल्या दक्षता पथकाच्या कारवाईने चांगलेच अंगलट येत आहे.

मानोरा तहसील अंतर्गत एकूण सहा एवढे अवैध गौण खनिज उत्खनन वाहतुकीवर निर्बंध आणण्यासाठी दक्षता पथकांची जिल्हा प्रशासनाद्वारे निर्मिती करण्यात आली आहे.
मंडळ अधिकारी सुभाष जाधव यांच्या नेतृत्वातील मानोरा शहरातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक विरोधी पथकाने मागील एका आठवड्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकी विरोधात सलग तिसऱ्यांदा कारवाई केल्याने गौण खनिज माफीयांमध्ये चांगलीच खळबळ निर्माण झालेली आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या वाहनांद्वारे तहसील परिसरामध्ये अवैध गौण खनिज टाकल्यामुळे सहा ब्रास गौणखनिजाला जवळपास दहा लाखाच्या आसपास दंड ठोठावण्यात आल्याचे प्रकरण ताजे असताना परत बावीस घनमीटर अवैध वाळूने भरलेला ट्रक दक्षता पथकाने जप्त केलेला आहे.

अवैध वाळूने भरलेला ट्रक जप्त करण्याची शाही वाळत नाही तोच मानोरा शहरांमध्ये एम एच 37 एफ 23 46 या क्रमांकाचे संशयास्पद ट्रॅक्टरची तपासणी दक्षता पथकाने केली असता कुठल्याही प्रकारचे स्वामित्व धनाची पावती नसल्याने सदरील वाळूने भरलेल्या वाहनाचा पंचनामा पथक प्रमुख जाधव यांच्यासमवेत तलाठी अरुण राठोड, शेजोळ यांनी करून वाहनाला पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतलेले आहे.

मानोरा शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर या वाहना द्वारा महसूल विभागाला चकवून अद्यापहि मोठ्याप्रमाणात भरमसाठ वाळू चोरी करून पर्यावरण ऱ्हास तथा शासकीय महसूलाला सुरुंग लावण्यात येत आहे हे विशेष