भंडारा-तुमसर मार्गाची तात्काळ दुरूस्ती करा! शिवसेना जिल्हामुख संजय रेहपाडे यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

50

भंडारा-तुमसर मार्गाची तात्काळ दुरूस्ती करा! शिवसेना जिल्हामुख संजय रेहपाडे
यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

भंडारा-तुमसर मार्गाची तात्काळ दुरूस्ती करा! शिवसेना जिल्हामुख संजय रेहपाडे यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा
भंडारा-तुमसर मार्गाची तात्काळ दुरूस्ती करा! शिवसेना जिल्हामुख संजय रेहपाडे
यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
7620512045

लाखणी :-भंडारा-तुमसर राज्यमार्ग क्रमांक ३५५ वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असुन याच रस्त्याने महाराष्ट्र व मध्यप्रदेश हि दोन राज्ये
एकमेकांशी जोडले जात आहेत.मात्र या मार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांमुळे वाहनधारकांना आणि प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.करीता या मार्गावरील रोडाची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय रेहपाडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग भंडाराचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
दरवर्षी पावसाळ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे खड्डे पडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येते. परंतू या वर्षी पावसाळा उलटून तीन महिन्याचा काळ लोटूनही या खड्डयाची डागडूगी करण्यात आली नाही. दोन महिन्यापुर्वी या पॅचेसच्या कामाचे टेंडर मागविण्यात आले होते. परंतु दोन-अडिच महिन्याचा काळ लोटूनही हे टेंडर खुले करण्यात आले नाही. यावरुन अधिकाऱ्यांची कर्तव्य दक्षता, जनतेप्रती जागरुकता दिसुन येते.
भंडारा-तुमसर मार्गावरील वरठी जवळील रेल्वे पुलापासुन ते बोदली पर्यंत रस्ता, त्याचप्रमाणे दहेगाव जवळील रस्त्यावर आणि मोहाडी येथे सा. बां. विभागाच्या कार्यालयासमोरच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तरीसुध्दा सा. बां. विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. अधिकाऱ्यांच्या अशा निष्काळजीपणामुळे या रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनधारकाना मोठया अडचणींचा सामना करावा लागत असुन खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक लहान मोठे अपघात होणे हे तर नेहमीचेच झाले आहे. सुदैवाने यामधून कोणतीही जिवित हानी झाली नाही. परंतू भविष्यात याची शक्यता नाकारता येत नाही.
शिवाय अशा मोठमोठया खड्डेयुक्त रस्त्यावरुन दुचाकी-चारचाकी वाहनांनी प्रवास करणाऱ्या जनतेला आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होत आहे.एकीकडे दिवसेंदिवस वाहनाचा रोडटॅक्स हा महाग होत असल्यामुळे वाहनधारकांना आर्थीक भुर्दँड बसतो. एवढे असूनही त्या मोबदल्यात त्यांना चांगले रस्ते न मिळणे हे त्या वाहन धारकावर एकप्रकारे अन्याय करण्यासारखे आहे. जनतेला होणाऱ्या या त्रासातुन मुक्त करण्यासाठी या रस्त्यावर त्वरित पंचेसचे टेंडर काढुन लवकरात लवकर पॅचेसच्या कामाला सुरुवात करण्यात यावी अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल, असा इशारा जिल्हा शिवसेना प्रमुख संजय रेहपाडे यांनी निवेदनातून दिला आहे.