विवाहितेच्या मानसिक व शारीरिक छळ या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध मानोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल.

50

विवाहितेच्या मानसिक व शारीरिक छळ या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध मानोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल.

भुषण कावडे प्रतिनिधी

मानोरा:- माहेरून गाडी घेण्यासाठी पैसे आणण्याच्या कारणावरून मानसिक व शारीरिक छळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मानोरा तालुक्यातील शेंदोना येथील चार जणांविरुद्ध दिनांक 29 ऑक्टोंबर रोजी मानोरा पोलिस स्टेशनला कलम 498, 504, 506, 34 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार फिर्यादी सौ कल्पना सुरेश राठोड राहणार शेंदोना यांनी फिर्याद दिली की मागील दोन ते तीन महिन्यांपासून फिर्यादीचे पती हे हे फिर्यादीला तुझ्या वडिलांकडून 50 हजार रुपये घेऊन ये असा तगादा लावत होता परंतु फिर्यादी पैसे देऊ शकले नाही म्हणून आरोपी पती व इतर आरोपी त्यांनी फिर्यादी विवाहितेस शिवीगाळ करून जीवाने मारण्याची धमकी दिली तसेच आरोपी पती सुरेश गोविंद राठोड सासु नवी गोविंद राठोड जेट मनतोष गोविंद राठोड जेठाणी शितल मनतोष राठोड सर्व राहणार शेंदोना यांनी पैसे आणण्यासाठी फिर्यादीचे शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले व जोपर्यंत पैसे आणणार नाही तोपर्यंत घरी येऊ नको असे म्हणून धक्का मारून घराबाहेर काढून दिले व जीवा ने मारून टाकील अशी धमकी दिली अशा जबानी रिपोर्ट वरून व महिला समुपदेशन केंद्र कारंजा यांच्या पत्रावरून सदर गुन्हा दाखल करून पुढील तपास एएसआय संजय शृंगारे करीत आहेत