निवडणूक पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

57

निवडणूक पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

निवडणूक पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
निवडणूक पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
7620512045

लाखणी:- निवडणूक
पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत निवडणुकांच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज लाखनी येथील तहसील कार्यालय व साकोली येथील उपविभागीय कार्यालयास भेट देवून पाहणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक वसंत जाधव, मुख्याधिकारी विनोद जाधव, लाखनी तहसीलदार महेश शितोळे, साकोली येथे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे उपस्थित होते.
21 तारखेल्या होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने लाखनी नगरपंचायत निवडणुकीसाठी स्थानिक प्रशासनाने केलेल्या कामाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला. लाखनी येथे मतदान केंद्रावर मतदान व मतमोजणीच्या अनुषंगाने आवश्यक ते मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात असल्याची माहिती यावेळी तहसीलदार शितोळे यांनी दिली.
मतदानाच्या दिवशी वाहन व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी अतिरीक्त बस किंवा वाहनांची मागणी आवश्यकता असल्यास ती उपजिल्हा निवडणूक शाखेकडे नोंदविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचीत केले. लाखनी येथील पोलीस विभागाकडून नियुक्त कर्मचाऱ्यांची माहिती पोलीस उपनिरीक्षक मनोज वाडीवे यांनी दिली.
पाच दिवसांनी होणाऱ्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज असून साकोली येथील निवडणूक तयारीची संपूर्ण माहिती श्री. कातडे यांनी दिली. यावेळी स्ट्रॉग रूम सुसज्ज असणे गरजेचे आहे. मतदान केंद्र निहाय मनुष्यबळ तसेच मतमोजणीचे प्रशिक्षण, पोस्टल बॅलेटचे वाटप तसेच प्रशिक्षणाला अनुपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.