घरून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी पोहचवले सुखरूप घरी
ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनच्या शोध पथकाचे सर्वत्र कौतुक

ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनच्या शोध पथकाचे सर्वत्र कौतुक
राहुल भोयर ब्रम्हपुरी शहर प्रतिनिधी मो 9421815114
प्रियकरा सोबत घर सोडून पडून गेलेल्या चौगाण येथील अल्पवयीन मुलीला ब्रम्हपुरी पोलिसांनी शोध घेऊन सुखरूप तिच्या घरी पोहचून दिल्या मुळे ब्रम्हपुरी पोलिसांच्या कार्याची सर्वत्र कौतुक होत आहे .
तालुक्यातील चौगान येथील एक अल्पवयीन मुलगी प्रियकरासोबत तीन दिवसांपूर्वी पळून गेल्याची घटना घडली होती . त्या अनुषंगाने मुलीच्या पालकांद्वारे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली . पोलीस तक्रार प्राप्त होताच व घटनेचे गांभीर्य आणि सर्वोच्च न्यायालयाचे दिशानिर्देश आपल्या लक्षात घेता शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे यांनी तपास हाती घेत त्या अल्पवयीन मुलीचा आणि तिच्या प्रियकराचा मोबाईल लोकेशन घेतला . तेव्हा दोघेही सावली तालुक्यातील अंतरगाव येथे असल्याची माहिती पोलीसांना मिळाली . त्यामुळे पोलिसांनी अंतरगाव गाठले व त्या अल्पवयीन मुलीला आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी मध्ये आणले व त्यांना समज देऊन सुखरूप घरी सोडून दिले .
सदरच्या वाढत्या घटना लक्षात घेता पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलींकडे लक्ष दिले पाहिजेत जेणेकरून भविष्यात होणारे अनुचित प्रकार टाळता येतील असे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे यांनी सांगितले . यावेळी शोधकामी नायक पोलीस शिपाई सचिन बारसागडे,दुमाजी घुटके व महिला पोलीस शिपाई शुभांगी शेमले यांनी मोलाची भूमिका बजावली