आता घरच्या घरी मिळवा डॉक्टरांच्या उपचाराचा सल्ला..! ई संजीवनी ऑनलाईन मोफत ओपीडी सेवा,राज्य शासनाद्वारे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध

49

आता घरच्या घरी मिळवा डॉक्टरांच्या उपचाराचा सल्ला..!
• ई संजीवनी ऑनलाईन ओपीडी सेवा
• राज्य शासनाद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धतात
• दररोज सकाळी 9.30 ते दुपारी 1.30, दुपारी 3 ते 5 वाजेदरम्यान मिळणार सल्ला

आता घरच्या घरी मिळवा डॉक्टरांच्या उपचाराचा सल्ला..! • ई संजीवनी ऑनलाईन ओपीडी सेवा • राज्य शासनाद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धतात • दररोज सकाळी 9.30 ते दुपारी 1.30, दुपारी 3 ते 5 वाजेदरम्यान मिळणार सल्ला
आता घरच्या घरी मिळवा डॉक्टरांच्या उपचाराचा सल्ला..!
• ई संजीवनी ऑनलाईन ओपीडी सेवा
• राज्य शासनाद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धतात
• दररोज सकाळी 9.30 ते दुपारी 1.30, दुपारी 3 ते 5 वाजेदरम्यान मिळणार सल्ला

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
9860020016

बुलडाणा : – भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने जनतेच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय टेलिकन्सल्टेशन सेवेद्वारे ऑनलाईन ओपीडी सेवा सुरू केली आहे. नॅशनल टेलिकन्सल्टेशन सर्विसद्वारे रूग्णांना त्यांच्या आजारावर पाहिजे असलेला सल्ला किंवा उपचाराबद्दलची माहिती रूग्णालयात न जाता घरच्या घरी मिळू शकणार आहे. त्यासाठी ई संजीवनी ऑनलाईन ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे.
सी – डॅक या संस्थेकडून https://esanjeevaniopd.in हे पोर्टल व esanjeevaniopd हे मोबाईल वरील ॲप विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर किंवा ॲपचा उपयोग करून ऑनलाईन उपलब्ध असलेल्या डॉक्टरांशी ऑडीओ – व्हिडीओद्वारे सल्लामसलत करून रूग्ण त्यांच्या आजारावर विनामूल्य सल्ला घेवू शकतात. रूग्णाच्या वेगवेगळ्या आजारांवर या सेवेद्वारे सल्ला दिला जातो. तसेच ई प्रेस्क्रिप्शन दिल्या जाते.
सध्याच्या कोरोना साथरोगामध्ये ही सेवा खूप उपयोगाची ठरणार आहे. रूग्णाला रूग्णालयात न जाता घरच्या घरी त्यांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांच्या सल्ला घेता येणार आहे. शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे सदर सेवेसाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ते सकाळी 9.30 ते दुपारी 1.30, दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत ई संजीवनी ओपीडी सेवेसाठी उपरोक्त पोर्टल व ॲपवर ऑनलाईन उपलब्ध असणार आहे.
तरी शासनाने जनतेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या उपक्रमाचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तडस यांनी केले आहे.
ई. संजीवनी ओपीडीची ठळक वैशिष्ट्ये
रूग्णाची नोंदणी, टोकन निर्मिती, रांग व्यवस्थापन, डॉक्टरांशी ऑडिओ – व्हिडीओ सल्लामसलत, ई प्रेस्क्रिप्शन, एसएमएस / ई मेल द्वारे सूचना, राज्याच्या डॉक्टरांद्वारे विनामूल्य सेवा.