लाखनी नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराने वंचित बहुजन आघाडीचा घेतला धसका

49

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
7620512046

लाखनी : सध्या तालुक्यात नगरपंचायत निवडणुकीचा जल्लोष सुरू आहे. यामध्ये प्रभाग क्र. ०७ मधील अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार मनीषा विशाल तिरपुडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अश्वीनी दिलीप भिवगडे यांच्या उमेदावारीचा धसका घेतला आहे. त्यांनी हेतुपुरस्पर स्वतःच्या शिकवणी मतपत्रीकेत क्र. ०४ मध्ये ” नोटा ” हा शब्दप्रयोग केलेला आहे. यांवरून असे दिसून येते की , काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने जणु वंचितच्या उमेदवाराचा धसकाच घेतला आहे. या प्रभागामध्ये चार उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये वंचितचे उमेदवार अश्वीनी दिलीप भिवगडे ह्या चौथ्या क्रमांकावर आहेत. असे असूनही काँग्रेसच्या उमेदवाराने आपल्या शिकवणी मतपत्रीकेत क्र. ०४ मध्ये नोटा हा शब्द वापरून एकप्रकारे वंचीतच्या उमेदवारावर अन्याय केला आहे. अशी प्रतिक्रिया मतदार वर्गामधून येत आहे.
यासंबंधीची तक्रार वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने तालुका निवडणुक निर्णय अधिकाऱ्याकडे केली आहे. निवडणुक अधिकाऱ्याने संबंधीत काँग्रेसच्या उमेदवारावर कायदेशीर कार्यवाही करावी. अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष दिपक जनबंधु यांनी केली आहे.