नामवंत शाळेकडे जाणारा वळणदार रस्ता, विद्यार्थ्यांसाठी धोकादायक प्रशासन व शाळा व्यवस्थापनाकडून उपाययोजना आवश्य

58

नामवंत शाळेकडे जाणारा वळणदार रस्ता, विद्यार्थ्यांसाठी धोकादायक

प्रशासन व शाळा व्यवस्थापनाकडून उपाययोजना आवश्य

नामवंत शाळेकडे जाणारा वळणदार रस्ता, विद्यार्थ्यांसाठी धोकादायक  प्रशासन व शाळा व्यवस्थापनाकडून उपाययोजना आवश्य
नामवंत शाळेकडे जाणारा वळणदार रस्ता, विद्यार्थ्यांसाठी धोकादायक
प्रशासन व शाळा व्यवस्थापनाकडून उपाययोजना आवश्य

✒️क्रिष्णा वैद्य ✒️
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500

ब्रम्हपुरी :-विद्यानगरी म्हणून नावलौकिक मिळवलेल्या ब्रम्हपुरी शहरात नेवजाबाई हितकारिणी शाळा संस्थान व त्याच व्यवस्थापनाची एल. एम. बी. कॉन्व्हेंट ही शाळा सुद्धा शहरातील मध्यवर्ती भागात व नावाजलेली असल्याने शहरातील व शहराबाहेरील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात विद्यार्जनासाठी येथे येत असतात मात्र शाळेत विद्यार्थी ये-जा करीत असतांना शाळेलगत असलेल्या मोठ्या रस्त्यावरून शाळामार्गकडे येणाऱ्या वळणावर शाळेकरी मुलं व वाहणाची मोठी तारांबळ होतं असल्याने तिथे अपघाताची शक्यता नेहमीच दिसून येतं आहे

अशीच एक घटना14 डिसेंबर ला सकाळी 8:30 वाजता त्याच धोकादायक वळणावर घडली,नेवजाबाई हितकारीणी विद्यालयात शिकत असलेला विद्यार्थी एल.एम. बी. कॉन्व्हेंट लगत असलेल्या वसतिगृहा शेजारील गेट जवळ असतांना कॉन्व्हेंट मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थीची आई स्कूटी गाडीने आपल्या पाल्याला एल.एम.बी कॉन्व्हेंट येथे सोडून देण्या करीता येत असतांना
नेवजाबाई हितकारिणी शाळेतील गरीब विद्यार्थ्याच्या पायावरून त्या महिलेच्या स्कूटी गाडीचा चाक गेला व जागेमध्येच ब्रेक मारला गेल्याने मुलाचा पाय स्कूटी गाडीच्या चाकामध्ये फसून राहिला मात्र ती स्कूटी चालक महिला त्या अपघातग्रस्त मुलाकडे अजिबात लक्ष देत नव्हती तर जखमी मुलाच्या रडण्याच्या आवाजाकडे सुद्धा दुर्लक्ष करीत असल्याने प्रसंगावधानराखत लगतच्या मुलाने अपघातग्रस्त मुलाचा पाय ओढून चाकातून काढला तेव्हा त्या जखमी मुलाच्या पायाला बराच मार लागला होता व हाडाचा भाग दिसतं होता. एवढे होऊन सुद्धा त्या महिलेने जखमी मुलाबद्दल कोणतीही सहानुभूती न दाखवता आपल्या पाल्याना गाडीवरून शाळेसाठी उतरवत परतीचा प्रवास पकडला

सदर वळणावर खूप लहान रस्ता व या रस्त्याने स्कूटर, मोटर सायकल व चार चाकी वाहने मोठ्या प्रमाणात शाळेच्या वेळेत जमा होतं असल्याने खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते.यामुळे इथे अपघात होणे सहाजिकच वाटतो तेव्हा अशा ठिकाणी शाळा व्यवस्थापनाकडून अथवा प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात व विद्यार्थ्यांच्या जीविताशी गंभीर मुद्यावर काळजीपूर्वक लक्ष देऊन भविष्यात होणाऱ्या अनिष्ट घटनापासून खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे अशी मागणी पालकवर्गातून केली जात आहे.