शहरात जनावरे चोरट्यांचा धुमाकूळ बल्लारपूर येथील घटना; एकाच रात्री चार ते पाच गाई गेल्या चोरीला

64

शहरात जनावरे चोरट्यांचा धुमाकूळ

बल्लारपूर येथील घटना; एकाच रात्री चार ते पाच गाई गेल्या चोरीला

शहरात जनावरे चोरट्यांचा धुमाकूळ बल्लारपूर येथील घटना; एकाच रात्री चार ते पाच गाई गेल्या चोरीला
शहरात जनावरे चोरट्यांचा धुमाकूळ
बल्लारपूर येथील घटना; एकाच रात्री चार ते पाच गाई गेल्या चोरीला

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

बल्लारपूर. ता.१८:- शहरात मागील काही दिवसांपासून जनावरे चोरीच्या मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. रात्रीचा अंधाराचा लाभ घेत चक्क गोठ्यात घुसून शेतकऱ्यांचे गुरे ढोरे लंपास करीत आहेत. शहरात अवघ्या दोन दिवसापूर्वी
गणपती वार्ड येथून विजय चंद्रपाल शर्मा यांच्या गोठ्यातून गिर प्रजातीची गाय चोरीला गेली असून, याच रात्री ईतर तीन ते चार गाई चोरी गेल्याची घटना समोर आली आहेत. शर्मा यांच्या तक्रारवरून स्थानिक पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
बुधवार रात्रीच्या सुमारास गणपती वार्ड येथील रहिवासी विजय चंद्रपाल शर्मा यांच्या गोठ्यातून गिर प्रजातीची गाय चोरीला गेली आहे. शर्मा यांचा दुधाचा व्यवसाय आहे. अचानक चोरीला गेलेल्या गाईमुळे शर्मा यांचे ६० ते ७० हजाराचे आर्थिक नुकसान झाले आहेत. बाहेरील एक टोळी शहरात येऊन रात्रीचा अंधारात जनावरे लंपास करीत आहेत. या एकाच रात्री शहराच्या वेगवेगळ्या भागातून तीन ते चार गाई चोरी गेल्याची घटना समोर आली आहेत. या चोरीबाबत पोलिसात तक्रार दाखल केली असून, स्थानिक पोलिस सीसीटिव्ही’चा आधार घेत या चोरट्यांचा शोध घेत आहेत.