कळमेश्वर दुय्यम निबंधकावर कारवाई करून बदली करा, वकील संघटनेची मुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्र्यांकडे मागणी.
● वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची पत्रपरिषदेत माहिती.

● वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची पत्रपरिषदेत माहिती.
✒ युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
📲 9923296442
नागपुर:- नागपुर जिल्हातील कळमेश्वर शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात सावळागोंधळ सुरू असून दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कृष्णा राऊत यांच्याकडून पैशाची मागणी केली जाते. दस्त नोंदणीसाठी लागणारे सर्व कागदपत्रे रितसर असून सुद्धा त्यामध्ये तृट्या काढून नागरिकांना त्रास देतात याबाबत सह जिल्हा निबंधक वर्ग तथा मुद्रांक जिल्हाधिकारी नागपूर, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्री पशुसंवर्धन व दुग्धविकास, नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक पुणे, नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक पुणे, नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक नागपूर विभाग नागपूर, विभागीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर, जिल्हाधिकारी नागपूर यांना याबाबत तक्रारीत करण्यात आल्या होत्या तक्रारीमध्ये कळमेश्वर दुय्यम निबंधक कृष्णा राऊत कार्यालयात दस्त नोंदणीस येणारे पक्षकार तसेच वकील मंडळी कडून कुठलीही दस्त नोंदणी करिता अवैधरित्या पैशाची मागणी करून पैसे न दिल्यास दस्त नोंदणी करिता टाळाटाळ करून वकीलांची अवमानना करीत असल्याने दुय्यम निबंधक कृष्णा राऊत यांच्यावर कार्यवाही करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. सदर तक्रारीची प्रसार माध्यमात सुद्धा गंभीर दखल घेण्यात आली होती.
दुय्यम निबंधका विरुद्ध आलेल्या तक्रारीवरून सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी गंभीर दखल घेऊन प्रशासकीय कारणास्तव कळमेश्वर येथील दुय्यम निबंधक राऊत यांचेकडील दुय्यम निबंधक पदाचा कार्यभार दिनांक 16 सप्टेंबर 2021 पासून काढून घेतला होता व त्यांची सेवा सह जिल्हा निबंधक वर्ग 1 नागपूर ग्रामीण कार्यालयात पुढील आदेशापर्यंत वर्ग करण्यात आली होती तसेच दुय्यम निबंधक कृष्णा राऊत यांची कार्यालयीन चौकशी करणे बाबत आदेशित करून कृष्णा राऊत यांना पत्र प्राप्ती पासून आठ दिवसाचे आत त्यांचे म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. कार्यालयीन चौकशीचे आदेश होऊन त्यांचेकडून पदाचा कार्यभार काढून घेतला जाऊन सुद्धा दिनांक 15 नोव्हेंबर 2021 पासून पुनश्च कृष्णा राऊत यांच्याकडे कळमेश्वर येथील दुय्यम निबंधक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला अवघ्या दोन महिन्याचे कालावधीत कृष्णा राऊत यांचेकडे दुय्यम निबंधक कार्यालयाचा पदभार सोपविण्यात आला हे अनाकलनीय असून वकील संघाच्या तक्रारीची अवहेलना करण्यात आल्याचा आरोप वकील संघटनेकडून करण्यात आला आहे.
जेव्हापासून कृष्णा राऊत याच्याकडे कारभार सोपविण्यात आला तेव्हापासून ते कळमेश्वर येथील वकिलांना उद्धटपणे वागणूक देतात अरेरावीची भाषा वापरतात तसेच त्यांचे राजकीय संबंध वर पर्यंत असल्याचे सांगून माझे कुणीही काहीही करू शकत नाही असे वक्तव्य करतात वकील वर्गास अपमानजनक वागणूक देऊन त्यांची कामे करण्यास टाळाटाळ करतात असा आरोप सुद्धा वकील संघटनेकडून करण्यात आला आहे. दुय्यम निबंधक कृष्णा राऊत हे प्रशासकीय पदावर असून सुद्धा बेकायदेशीर व बेशिस्त वागणूक ठेवून प्रशासकीय नियमांचे उल्लंघन करतात त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे वकील संघाचे म्हणणे असून कळमेश्वर येथील दुय्यम निबंधक राऊत यांचा कडील कळमेश्वर कार्यालयाचा पुनश्च सोपविलेल्या पदभार तात्काळ काढून घ्यावा त्यांची उचलबांगडी करावी तसेच दुय्यम निबंधक राऊत यांनी सादर केलेल्या स्पष्टीकरनाची प्रत द्यावी त्यांच्यावर योग्य कठोर कार्यालयीन कारवाई करावी अशी मागणी कळमेश्वर येथील वकील संघटनेकडून पत्रपरिषदेत करण्यात आली. पत्रपरिषदेला एडवोकेट हर्षल यावलकर, लंकेश गजभिये, आकाश काळे, निलेश अंजनकर, पल्लवी मंडलिक, जयश्री पवार, श्रद्धा कळंबे, पुनम सोन, विद्या शेवाळे, विभा अंजनकर यांची उपस्थिती होती .
ब्लॉक रजिस्टर राऊत ची महिला वकील यांना धमकी
पार पडलेल्या पत्रपरिषदेत पुरुष वकिलांसह महिला वकिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता या पत्रपरिषदेत महिला वकिलांनी आपल्या आपबिती सांगितल्या यामध्ये वकील संघाकडून आलेली तक्रार सत्य आणि योग्य असून गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात महिला वकिलाकडून गेलेल्या दस्तावर दुय्यम निबंधक राऊत यांच्याकडून त्रुटी काढण्यात येत असून दस्त परत केले जाते परंतु तेच दस्त त्यांच्या मर्जीतील अर्जनविस यांचेकडून गेले असता ते दस्त लावतात तृट्या काढून पैशाची मोठी मागणी केली जाते पैसे न दिल्यास दस्त परत केल्या जातो महिला वकिलांसह स्त्रियांबाबत दुय्यम निबंधक यांचा व्यवहार योग्य नसून महिलां बाबतीत इतरांसोबत आक्षेपार्ह गोष्टी करतात त्यांना याबाबत जाब विचारण्यास काही महिला वकील गेल्या असता हे मी बोललोच नसल्याचे सांगतात महिला वकिलांना त्यांच्या कार्यालयात जाण्यासाठी दहा वेळा विचार करावा लागतो या अगोदर सुद्धा अनेक निबंधक आले त्या सर्वांनी वकिलांना कधीही त्रास दिला नाही परंतु कृष्णा राऊत दुय्यम निबंधक यांनी आल्यापासून वकिलांना त्रास देणे सुरू केले असून विशेष म्हणजे महिला वकिलांना हे निबंधक त्रास देतात आम्ही महिला वकिलांनी कामे सोडून घरी बसावे का असा सवाल पत्रपरिषदेत महिला वकिलांनी प्रशासनाला विचारला महिला वकील यांना तुम्ही डॉक्युमेंट का लावता हे अर्जंनविसाचे काम आहे असे सांगितले जाते याबाबत काही दिवसापूर्वी सह जिल्हा निबंधकडे तक्रारी करून सुद्धा थातूरमातूर कारवाई करण्यात आली जर वकिलांसोबत असा व्यवहार होत असेल तर सामान्य माणसाचे काय असा प्रश्न सुद्धा पत्रपरिषदेत महिला वकिलांनी केला मृत्युपत्र मोरगेज आधी साठी पैसे द्यावे लागतात कोरोना काळात कामे बंद असल्याचे सांगितले गेले परंतु मागील दरवाजातून पैसे घेऊन काम केल्या गेल्याने काही महिला वकिलांनी आपले सरकार या वेबसाईटवर तक्रारी केल्या तक्रार केल्यानंतर आता तुमचे काम कसे होते ते मी बघतो अशी धमकी सुद्धा दुय्यम निबंधक राऊत यांनी महिला वकिलांना दिल्याचे पत्रपरिषदेत महिला वकिलांनी सांगितले.