ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे

58

ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा
– अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे

ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा - अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे
ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा
– अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
8208166961

औरंगाबाद : – शासनाच्या ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांमध्ये अधिकाधिक जागृती करण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांनी आज केले. तसेच हा प्रकल्प शेतकरी आणि प्रशासनातील विविध विभागांसाठी उपयुक्त असल्याचेही ते म्हणाले.
राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ई-पीक पाहणी प्रकल्पाबाबत प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात पार पडले. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ.गव्हाणे मार्गदर्शन करताना बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार यांनी प्रशिक्षण घेतले. तहसीलदार तथा ई-पीक पाहणी प्रकल्पाचे सह राज्य समन्वयक बालाजी शेवाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
डॉ. गव्हाणे यांनी या प्रकल्पात शेतक-यांचा सहभाग वाढवावा. त्यामुळे ई-पीक पाहणीमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांची नोंदणी करावी. पिकांची नोंदणी करून घेण्यासाठी उपाययोजना कराव्यात याबाबतही मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाचे सुरवातीला निवासी उपजिल्हाधिकारी श्री. हदगल यांनी केले. शेतक-यांसाठी व प्रशासनासाठी असलेली ई पीक पाहणी मोबाईल ऍ़पची उपयुक्तताही सांगितली. प्रकल्प शेतकरी व प्रशासनातील सहकार विभाग, कृषी विभाग, महसूल विभाग, पणन विभाग व इतर विभागासाठी उपयुक्त असल्याचे श्री. शेवाळे यांनी सांगितले. शेतक-यांची नोंदणी, पिकाची नोंदणी, पडित क्षेत्राची नोंदणी, जल सिंचनाच्या साधनाची नोंदणी याबाबतही त्यांनी प्रशिक्षण दिले. तसेच प्रकल्प अंमलबजावणीमध्ये येणा-या तांत्रिक व इतर अडचणी, शंकांचे निरसन केले.