निःशुल्क ई-श्रम नोंदणी तुमसर येथे

60

निःशुल्क ई-श्रम नोंदणी तुमसर येथे

निःशुल्क ई-श्रम नोंदणी तुमसर येथे
निःशुल्क ई-श्रम नोंदणी तुमसर येथे

✍मुकेश मेश्राम ✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
7620512045

लाखणी:-असंघटित कामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाच्या हितकारी योजना आहेत. मात्र, त्याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नसल्याने जिल्ह्यातील तुमसर शहरातील प्रभाग क्रमांक तीनच्या हनुमाननगर येथे असंघटित कामगारांची निःशुल्क ई श्रम नोंदणी करण्यात आली. राज्यातील बांधकाम क्षेत्रातील मजुरांना आरोग्य, शिक्षण व सामाजिक सुविधा मिळाव्यात व आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने कामगार कल्याण मंडळाची स्थापना करून अनेक योजना राबविण्यात आल्या. मात्र, माहितीअभावी अनेक कामगार मिळाले नाहीत.
केंद्र शासनाच्या केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालयातर्फे असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व
कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी वरिष्ठांच्या सूचनेवरून शिवसेनेचे विभागप्रमुख अमित मेश्राम यांनी कामगारांची नोंदणी करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सीएससी केंद्र चालक दीपक मलेवार यांच्या सहकार्याने कामगारांची नोंदणी करण्यात आली. या शिबिरात परिसरातील बेरोजगार व असंघटित कामगारांची नोंदणी करण्यात आले. यावेळी राजेश बडवाईक, महेंद्र ईखार, उमेश लोहबरे, तुषार गणवीर, अश्विनी बडवाईक, रेखा चोपकर, रंजिता साखरवाडे, विद्या शेंडे, शारदा पोटभरे, शोभा रोहनकर, सीमा जिभकाटे, मनीषा हरडे, जयश्री पोटभरे, श्याम बांगळकर, योगेश विधालोरे, राम शेंडे, सागर बर्वेकर, मनोज बांगळकर, रितेश शेंडे, स्वप्नील बडवाईक, लोकेश लोहबरे, सुनील साकुरे यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.