डोक्यावर दगडाने मारून जखमी केल्याप्रकरणी एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल. 

55

डोक्यावर दगडाने मारून जखमी केल्याप्रकरणी एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल. 

कुपटा येथिल घटना

भुषण कावडे प्रतिनिधी

मानोरा:- किरकोळ वादावरून डोक्यात दगड मारून जखमी केल्याची घटना दि. ३० ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वा. मानोरा तालुक्यातील कुपटा येथे घडली असुन या प्रकरणी एका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार फिर्यादी अनिस खान गुलर खान यांनी फिर्याद दिली की दिनांक ३० ऑक्टोंबर रोजी सकाळी फिर्यादी व फिर्यादी चा मुलगा शेतात पाणी सोडण्यासाठी सकाळी दहा वाजता गेला व साडेदहा वाजता घरी परत आला असता फिर्यादी चा मुलगा गाडीजवळ उभा होता तेव्हा अयान खान अनिस खान हा फिर्यादीच्या मुलाला मारहाण करीत होता तेव्हा फिर्यादीने आरोपी अयान खान यास का मारत आहेत असे विचारले असतात आरोपी यांनी जमिनीवरील गोटा उचलून फिर्यादीच्या डोक्यावर मारला त्यामुळे फिर्यादीचे डोके फुटून रक्त निघाले व फिर्यादीच्या मुलास मुका मार लागला त्यावेळी बाजूला उभ्या असलेल्या काही लोकांनी सदर भांडण सोडवले अशाच जबानी रिपोर्ट वरून व वैद्यकीय अहवालावरून आरोपी अयान खान अनिस खान राहणार कुपटा याच्या विरोधात कलम ३२४ भांदवी प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत