रा. म. गांधी महाविद्यालय नागभीड येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत काम बंद आंदोलन

✒ अरुण रामुजी भोले✒
नागभिड तालुका प्रतिनिधि
9403321731
नागभिड : – महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समीतीने घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शासनास करुनही शासन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे व आश्वासित प्रगती योजनेचा अन्यायकारक शासन निर्णय दि . ७ डिसेंबर २०१८ व १६ फेब्रुवारी २०१ ९ रद्द करून आश्वासित प्रगती योजना पूनर्जीवित करणे यासह अन्य मागण्यांसाठी १८ डिसेंबर पासून पुकारलेल्या बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आले .
बेमुदत कामबंद आंदोलन राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय नागभीड येथील शिक्षकेतर कर्मचारी श्री. नरेश देसाई, कनिष्ठ लिपिक- सचिव श्री. प्रदीप मोहूर्ले, प्रयोगशाळा परिचर- अध्यक्ष, श्री. सुमित बोन्द्रे, श्री. राजेश कोरे, श्री. दिपक समर्थ, श्री. आशिष कांबळे, श्री. वसंता नागोसे, सदस्य इत्यादींनी बेमुदत कामबंद आंदोलनात सहभाग घेतला असून जोपर्यंत मागण्या मंजूर होणार नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन संयुक्त कृती समीतीच्या मार्गदर्शनानुसार सुरूच ठेवणार आहोत असे अध्यक्षांनी कळविले आहे . बेमुदत काम बंद आंदोलन स्थळाला महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापक वृंद यांनी आंदोलनास सदिच्छा दिल्यात व न्याय मागण्याना पाठिंबा जाहीर करून शासनाने या रास्त मागण्यांची पूर्तता करावी असे मत व्यक्त केले .