जिल्हा परिषदेवर काँग्रेस पक्ष सत्ता स्थापणार! जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांना विश्वास

56

जिल्हा परिषदेवर काँग्रेस पक्ष सत्ता स्थापणार!
जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांना विश्वास

जिल्हा परिषदेवर काँग्रेस पक्ष सत्ता स्थापणार! जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांना विश्वास
जिल्हा परिषदेवर काँग्रेस पक्ष सत्ता स्थापणार!
जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांना विश्वास

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा

लाखणी :-मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणूका दि. २१ डिसेंबरला संपन्न झाल्या असून यात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप-शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी यासह इतर पक्षांनी निवडणूक लढविली. यात मतदारांची काँग्रेस पक्षाला पसंती जास्तीत जास्त झाल्याने भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीवर काँग्रेस पक्ष सत्ता स्थापणार असा विश्वास कांग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी व्यक्त केला.
मोहन पंचभाई पुढे म्हणाले देशात सन 2014 पासून भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात आहे. या सरकारने देशाच्या लोकशाहीचे धिंडवडे काढत सामान्यांचे हीत संपुष्टात आणण्याचे षडयंत्र चालविले आहे. मोजक्या भांडवलदार व कारखानदारांना संरक्षण देऊन देश विकण्याचे कार्य चालविले आहे. कोरोनाच्या नावावर देशाच्या जनतेला भूलथापा देऊन गरिबांचे जिने हराम केले आहे. देशाचा संपन्न इतिहास मिटविण्याचे कार्य केन्द्र सरकारने चालविले असल्याने हळूहळू मतदार लूटमार केंद्र सरकारला जागा दाखविण्यासाठी सज्ज झाले आहे. त्याचे प्रत्येय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकित भाजप पक्षाच्या सरकारला यावा यासाठी जुने ते सोने म्हणून जनतेने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मतदान केल्याने भंडारा जिल्हा परिषदेवर काँग्रेस पक्षाची सत्ता येणार असा ठाम विश्वास काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी बोलताना व्यक्त केला.
52 सदस्य असलेल्या भंडारा जिल्हा परिषदेत ओबीसी आरक्षणामुळे 39 जिल्हा परिषद सदस्यांची निवडणूक झाली. उर्वरीत 13 सदस्यांची निवडणूक 18 जानेवारीला होणार आहे. तसेच जिल्ह्यातील तीन नगरपंचायत लाखांदूर, लाखनी व मोहाडी येथील निवडणुकाही झाल्यात. या सर्व निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला भरघोस यश मिळणार असल्याचे प्रतिपादन मोहन पंचभाई यांनी केले. खालच्या माणसापर्यंत काम करणारा पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आहे. दिनांक 21 डिसेंबरला झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला भरघोष यश मिळणार असल्याचे पंचभाई म्हणाले.