ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत राजुरा विधानसभेत सेनेचा वरचष्मा
5 पैकी 4 जागेवर शिवसेनेचे उमेदवार विजयी
पहील्यांदा निवडणूक लढवलेल्या वीरूर येथे एका जागेवर निसटता पराभव

5 पैकी 4 जागेवर शिवसेनेचे उमेदवार विजयी
पहील्यांदा निवडणूक लढवलेल्या वीरूर येथे एका जागेवर निसटता पराभव
खुशाल सूर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण
प्रतीनीधी
8378848427
राजुरा विधानसभेत ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका पार पडल्या.
यामध्ये शिवसेनेचे सास्ती येथे 2 उमेदवार, रामपूर येथे 1 उमेदवार, हरदोना येथे 1 उमेदवार अशे एकूण 4 उमेदवार विजयी झाले.
वीरूर येथील एका जागेवर पहिल्यांदाच निवडणूक लढून निसटता पराभव झाला. याठिकाणी काँग्रेस उमेदवाराला विजयी करण्यासाठी आणि शिवसेनेच्या उमेदवाराला पाडण्यासाठी भाजपने शेवटच्या दिवशी आर्थिक रसद पुरवून प्रयत्न केले.
जिल्ह्यातील नगरपंचायत आणि ग्रामपंचायत पोटनिवडणूकित शिवसेना ताकतीने उतरलेली दिसली.
चंद्रपूर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात सर्वत्र भगवी लाट निर्माण जाल्याचे चित्र निर्माण झाले.
राष्ट्रीय पक्षांची तळजोळ चालू असताना शिवसेनेने मात्र स्वबळावर ही निवडणूक अटीतटीची बनवली.
त्याचीच प्रचिती म्हणून आज ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळाले.
सास्ती मुरारी बुगावार,पोर्णिमा भटारकर,रामपूर लता डूखरे,हरदोना किसन टेकाम अशे विजयी उमेदवाराचे नाव आहे.
विजयी उमेदवाराचे शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे, महिला उपसंघटिका सरिताताई कुळे, तालुका प्रमुख वासुदेव चापले,उपतालुका प्रमुख रमेश झाडे, उपतालुका प्रमुख रमेश पेटकर, माजी संघटक नरसिंग मादर,युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर,ग्रा सदस्य सास्ती कुणाल कुळे,माजी तालूका प्रमुख जीवन बुटले,माजी सरपंच रामपूर रमेश कुळे,अतुल खनके,उत्तम गिरी, कोमल फुसाटे, महादेव खंडाळे आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.