बाळापुर आदिवासी सेवा सहकारी संस्थेवर अध्यक्ष उपाध्यक्ष पदाकरिता अविरोध निवड.

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधि*
*9403321731*
नागभिड : – नागभीड तालुक्यातील बाळापूर येथील आदिवासी सेवा सहकारी संस्थेवर धनराज बावनकर यांच्या नेतृत्वात अविरोध निवडनुक झाली होती. भाजपाप्रणीत गटाने अविरोध विजय संपादन केला होता .दिनांक 21 /12/ 2021 ला पडलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी अविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी श्रीहरी महादेव मडावी तर उपाध्यक्षपदी धनराज बावनकर यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून श्री गौरकर साहेब यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडली. संचालक विलास मोहूर्ले, सौ कमलाबाई कुंभरे,चरणदास मासुरकर श्री जोगेश्वर कुंभरे ,श्री दामोदर कुळमेथे,श्री विनायक सयाम, गुरुदास सयाम ,अरविंद कोहपरे, मुखरू शिंपी,रघुनाथ नान्हे इत्यादी संचालक उपस्थित होते. यावेळी भाजप कार्यकर्ते राजेश्वर गुरूपुडे, शांताराम मडावी, रमेश डहारे, प्रकाश डहारे, गुलाब कुंभरे, व्यवस्थापक दिनेश जी शिंपी, विजय मांढरे उपस्थित होते