नागभीड नगरपरिषद पोटनिवडणूक
काँग्रेस व मित्र पक्षाच्या सौ.सारिका बबन धारने यांचा विजय..
सत्ताधारी भाजपच्या उमेदवार मसराम यांचा दारुण पराभव…

काँग्रेस व मित्र पक्षाच्या सौ.सारिका बबन धारने यांचा विजय..
सत्ताधारी भाजपच्या उमेदवार मसराम यांचा दारुण पराभव…
*अरुण रामुजी भोले*
*नागभीड तालुका प्रतिनिधि*
*9403321731*
नागभीड : – नागभीड; प्रभाग 4 च्या काँग्रेस च्या नगरसेविका सौ.सारिका बबन धारने यांनी निवडून आल्यावर वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचे नगरसेवक पद रिक्त झाले होते.. त्या जागेसाठी काल दिनांक 21/12/2021 रोजी झालेल्या पोट निवडणुकीचा निकाल आज हाती आला…यात कॉंग्रेस च्या उमेदवाराला शिवसेना,मनसे,प्रहार,आप इत्यादी पक्षांनी पाठींबा दिलेला होता.. यात काँग्रेस ने सारिका बबन धारने याना उमेदवारी दिली होती तर भाजपा ने अंजु सुधीर मसराम यांना उमेदवारी दिली होती.
हाती आलेल्या निकालानुसार सारिका बबन धारने यांनी 864 मत घेत भाजपच्या मसराम यांचा 490 एवढ्या मोठ्या मतांनी पराभव केला.
भाजपाची सत्ता असलेल्या नागभीड नगरपरिषदेतील पदाधिकाऱ्यांना तसेच नेत्यांना या पराभवाने मोठा धक्का बसल्या असल्याचे बोलले जात आहे.. कारण येणाऱ्या पाच महिन्यानंतर नागभीड नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक आहे.. त्यापूर्वी हा झालेला पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे.
नागभीड नागररिषदेत सुरू असलेला मनमानी कारभार आणि प्रभागात न झालेले विकासकामे, याचे उत्तर जनतेने मतदानातून दिल्याचे या निकालातून स्पष्ट झालेले आहे
हा विजय खेचून आणण्यासाठी काँग्रेस चे युवा नेते रमेश ठाकरे, मनसे चे बंडू गेडाम,शिवसेनेचे भोजराज ज्ञानबोनवार,श्रिकांत पिसे,ईश्वर नागरिकर,प्रहार चे वृषभ खापर्डे,आप चे सुरेश कोल्हे, नगरसेवक संजय अमृतकर,जयप्रकाश गजपुरे,पारस नागरे,मधुकर बावनकर, पंकज काळबांधे, ,देवानंद कोवे,नासिर शेख,चेतन गेडाम,बबलू सोनावाणे,बबन धरणे,सौ.सुनीता सेलोकर ,जाल्या भाऊ,सतीश ठाकरे,प्रकाश ठाकरे,रवी वाघूरकर,महेश आलबनकर,भास्कर ठाकरे,संतोष देव्हारी,राकेश दुधपचारे, तसेच प्रभागातील सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली.
या विजयाबद्दल काँग्रेस व मित्र पक्षाच्या वतीने मतदारांचे आभार मानले गेले.