डॉ.आंबेडकरांनी संविधानाच्या निर्मितीतून राष्ट्र एकसंघ ठेवले… महेंद्र गोस्वामी

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनीधी लाखणी
जिल्हा. भंडारा
7620512045
लाखणी/पवनी:- भारतीय राज्यघटनेने या देशाला सक्षम व सुदृढ अशी लोकशाही दिली . एवढेच नव्हे तर संविधानाचे निर्माते डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण राष्ट्राला एकसंघ ठेवण्याचे महान कार्य केले , असे प्रतिपादन ॲड . महेंद्र गोस्वामी यांनी केले . बौद्ध समाज संघटना व रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पौना / बु . येथील आनंद बौद्ध विहार येथे तीन दिवसीय धम्म ज्योत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . त्या प्रसंगी ते बोलत होते . कार्यक्रमाचे उद्घाटन संविधानाचे अभ्यासक अॅड . महेंद्र गोस्वामी यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोज बन्सोड तर प्रमुख उपस्थिती विजय सावरबांधे , रोषण फुले , धम्मदिप दहिवले , शेखर पडोळे , वासुदेव विधाते , सरपंच रेखा पोगळे उपस्थित होते . डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित भारत देश महासत्ता होईल , असा विश्वास अॅड . गोस्वामी यांनी व्यक्त केला . धम्म ज्योत कार्यक्रमाची सुरुवात पुज्य भदंत चारूदत्त यांच्या हस्ते ध्वजारोहण व परित्राण पाठाद्वारे करण्यात आली . यावेळी सर्वांना सदाचरणाचा उपदेश दिला . यशस्वीतेसाठी बौद्ध विहाराचे अध्यक्ष विनोद आडिकने , सजन मेश्राम यांच्यासह बौद्ध विहाराच्या कार्यकर्ते व पदाधिकाच्या यांनी व महिला मंडळाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले .