अखेर तो वाघोबा अडकला वन कर्मचाऱ्यांच्या जाळ्यात…. पोंभुर्णा तालुक्यात धुमाकूळ घालणारा वाघ जेरबंद,वन विभागाने सोडला निश्वास

49

अखेर तो वाघोबा अडकला वन कर्मचाऱ्यांच्या जाळ्यात….

पोंभुर्णा तालुक्यात धुमाकूळ घालणारा वाघ जेरबंद,वन विभागाने सोडला निश्वास

अखेर तो वाघोबा अडकला वन कर्मचाऱ्यांच्या जाळ्यात…. पोंभुर्णा तालुक्यात धुमाकूळ घालणारा वाघ जेरबंद,वन विभागाने सोडला निश्वास
अखेर तो वाघोबा अडकला वन कर्मचाऱ्यांच्या जाळ्यात….
पोंभुर्णा तालुक्यात धुमाकूळ घालणारा वाघ जेरबंद,वन विभागाने सोडला निश्वास

राजेंद्र झाडे
गोंडपिंपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी/ पोंभुर्णा :-मागील दोन महिन्यांपासून पोंभुर्णा तालुक्यात धुमाकूळ घालत दोघांचा बळी घेणारा वाघोबा,दोघांना जखमी करणारा वाघोबा,अनेक पाळीव जनावरे फस्त करणारा वाघोबा स्वताच शिकारीच्या नादात फसला आणि वन कर्मचाऱयांनी मोठ्या शिताफीने त्यास जेरबंद केले ही घटना आज पोंभुर्णा ते आक्सापूर मार्गातील चेक आष्टा बस स्थानक लगत घडली
दुपारी एक वाजेच्या सुमारास चेक आष्टा बस स्थानक परिसरात एका बकरीची वाघाने शिकार केली हे शैळी मालकाचे लक्षात येताच आरडाओरड करताच मार्गावरील लोक जमा होऊन ओरडू लागले आणि वाघोबा मार्गातील पाईप पुलात घुसला आणि त्यात फसला हे लक्षात येताच लोकांनी एकच गर्दी केली व वन कर्मचाऱयांना माहिती दिली माहिती मिळताच वन कर्मचारी लगेच घटनास्थळी आले पाईप पुलाचे दोन्ही बाजूने बंदिस्त करून वरिष्ठ वन अधिकार्याना माहिती दिली माहिती मिळताच उपवनसंरक्षक अरविंद मुंढे ,वनपरिक्षेत्र अधिकारी आम्रपाली खोब्रागडे ,पशुवैद्यकीय अधिकारी ,आर आर युनिटचे कर्मचारी पोहचून मोठ्या शिताफीने त्याला जेरबंद केले व पुढील उपचार व कारवाईसाठी त्या वाघाला चंद्रपूरला हलविण्यात आले ही मोहीम सायंकाळी सात वाजेपर्यत सुरू होती
ही मोहीम उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी आम्रपाली खोब्रागडे,क्षेत्रसाहायक आनंदराव कोसरे,वनरक्षक पी एस शेंडे,बी एम रामटेके,शीतल कुलमेथे,आर एस मेश्राम,एस ए ढवळे,व्ही बी कस्तुरे,पी एस दुधबळे,ममता राजगडे व वनमजुरांनी केली
या वाघाला जेरबंद केल्याने नागरिकांसह वनकर्मचार्यानी सुटकेचा निश्वास सोडला