प्रा. सुरेश खोब्रागडे “राष्ट्रीय बहुजन मित्र” पुरस्काराने सन्मानित

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
7620512045
लाखनी :- येथील प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे यांना 2021 चा राष्ट्रीय बहुजन मित्र पुरस्कार देऊन गौरवांन्कित करण्यात आले. राष्ट्रीय बुद्धिष्ट साहित्य रीसर्च ग्रुप, इसासानी, नागपुर यांच्या वतीने दरवर्षीच नागलोक इतिहास परिषदेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी 19 डिसेंबर बाराव्या परिषदेत सुप्रसिद्ध समाजसेवक जोगेंद्र मंडल यांचे वंशज निर्मल मंडल यांच्या शुभ हस्ते आणि नागमित्र धर्मेंद्र पाटील, प्रविण रंगारी व उपस्थित मान्यवराकरवी त्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. इंटरनॅशनल नागराजा अंबातीत्थक नागलोक परिसरात मोठ्या संख्येने महाराष्ट्रातुन नागरिक उपस्थित होते.
प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे यांची दीक्षाभूमी एक चिंतनकाव्य (दिर्घकविता), मोर्चा (कवितासंग्रह), वेळेवर येणारे इतर विषय (कवितासंग्रह), मी आंबेडकर बोलतोय आणि मी माझ्या देशाच्या शोधात (दोन नाटके), आंबेडकरी कविता आस्वाद आणि मिमांसा (समीक्षा) क्रांती नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (वैचारिक), अशी प्रकाशित ग्रंथसंपदा असून समकालीन मराठी काव्य प्रवाह (समीक्षा) चोरबाजार (नाटक) राजा ढाले सामाजिक जीवन आणि चळवळी (प्रबंध अखंड 1) हे राजा ढाले वाड:मयीन जीवन आणि कर्तुत्व (प्रबंध खंड 2), म. भी. चिटणीस व्यक्ती आणि वाड्मय वैचारिक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्ष पूर्ण जीवनावरील महानाट्य “मूकनायक” अशा प्रकाशित होणाऱ्या ग्रंथसंपदा मुळे राष्ट्रीय सत्यशोधक समाज संयोजक समितीने त्यांच्या नावाची निवड करून राष्ट्रीय बहुजन मित्र पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे यांच्या मी आंबेडकर बोलतोय या नाटकाचे देशातील सात राज्यात 1000 प्रयोग तर मी माझ्या देशाच्या शोधात या नाटकाचे दोन राज्यात 107 प्रयोग रंगभूमीवरून सादर झाले आहेत. पुरस्काराबद्दल सी. एम. बागडे, भगवान सुखदेवे डॉ. धनंजय भिमटे, प्रल्हाद सोनेवणे, सुमनताई कानेकर, सी. के. लेंडारे, नामदेव कानेकर, व डॉ. युवराज मोटघरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.